Shubham Banubakode
भारतात ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर सर्वात आधी तिकीट काढावे लागते.
जर कुणी विनातिकीट प्रवास करत असेल त्याच्याकडून दंड वसूल केला जातो.
पण भारतात अशी एक ट्रेन आहे, ज्या ट्रेनने प्रवास करताना तिकीट काढण्याची आवश्यकता नाही.
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे.
विशेष म्हणजे गेल्या ७५ वर्षांपासून ही ट्रेन सुरु आहे.
या ट्रेनचं वैशिष्ट म्हणजे तुम्ही या ट्रेनने कितीही वेळा मोफत प्रवास करू शकता.
या ट्रेनचं नाव आहे भाकरा-नांगल ट्रेन
ही ट्रेन पंजाब ते हिमाचल प्रदेशदरम्यान १३ किलोमीटरचा प्रवास करते.
ही ट्रेन सतलज नदी ओलांडून शिवालिक टेकड्यांमधून जाते.
त्यामुळे प्रवाशांना निसर्गाचा विलक्षण अनुभव घेता येतो.
या ट्रेनमध्ये तीन लाकडी कोच आहेत, ज्यात ब्रिटीशकालीन खुर्च्या आहेत.
सुरुवातील ही ट्रेन वाफेच्या इंजिनावर चालवण्यात येत होती.
पण १९५३ नंतर ही ट्रेन डिझेल इंजिनावर चालवली जाऊ लागली.Bhakra Nangal Train Journey
भाकरा-नांगल धरणाचे बांधकाम सुरु असताना मजूरांसाठी ही ट्रेन सुरु करण्यात आली होती.
मात्र, धरणाचे काम पूर्ण झाल्यावर ती पर्यटकांसाठी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही ट्रेन रेल्वे विभाग नाही, तर भाकरा इंटरेस्ट मॅनेजमेंट बोर्डाद्वारे चालवली जाते.
या ट्रेनने दररोज ८०० प्रवासी प्रवास करतात.
तेजस, दुरंतो किंवा वंदे भारत नाही, तर 'या' रेल्वे गाडीची आहे सर्वाधिक कमाई