भाकरी झाली कडक? आता नाही होणार! या घरगुती ट्रिक्सने होईल मऊ अन् फुललेली

Aarti Badade

भाकरी फुगवण्यासाठी काय करावे?

भाकरी थापताना तुटत असल्यास किंवा ती फुगत नसल्यास, काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही गोल आणि मऊ भाकरी बनवू शकता.

Sakal

ताजे दळलेले पीठ

भाकरीसाठी नेहमी ताजे दळलेले पीठ (Fresh Flour) वापरावे, कारण जुने पीठ वापरल्यास भाकरी तुटण्याची शक्यता जास्त असते.

Sakal

कोमट पाण्याचा वापर

पीठ भिजवताना कोमट पाणी वापरा; थंड पाण्यामुळे पीठ तुटण्याची शक्यता वाढते आणि मळणे कठीण होते.

Sakal

योग्य प्रमाणात पीठ

पीठ खूप मऊ किंवा जास्त घट्ट न भिजवता, योग्य प्रमाणात पाणी वापरून मध्यम स्वरूपात मळून घ्या.

Sakal

हाताने मळणे महत्त्वाचे

पीठ भिजवल्यानंतर ते हाताने चांगले मळून घ्या, ज्यामुळे ते चिकट होणार नाही आणि भाकरी थापायला सोपी जाईल.

Sakal

तवा आणि जाडी

भाकरी जास्त पातळ वा जास्त जाड थापू नका आणि भाकरी फुगण्यासाठी तवा चांगला गरम झालेला असावा.

Sakal

भाकरीचे रहस्य

भाकरी तुटणार नाही याची खात्री करण्यासाठी, योग्य प्रमाणात पाणी वापरून मध्यम पीठ मळा आणि भाकरी गरम तव्यावर टाका—तुमची भाकरी मऊ आणि गोल बनेल!

Sakal

दिवाळी फराळ! खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्याची झटपट आणि खुसखुशीत रेसिपी

Khare Shankarpali

|

Sakal

येथे क्लिक करा