दिवाळी फराळ! खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्याची झटपट आणि खुसखुशीत रेसिपी

Aarti Badade

खुसखुशीत शंकरपाळे

दिवाळी फराळात गोड शंकरपाळ्यांसोबतच खारे शंकरपाळे (Khare Shankarpali) देखील आवडीने खाल्ले जातात. हे शंकरपाळे खुसखुशीत आणि चविष्ट बनवण्याची सोपी रेसिपी पाहा!

Sakal

लागणारे साहित्य (Ingredients)

१ कप मैदा, १/४ टीस्पून मीठ, १/४ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून ओवा, १/८ टीस्पून हळद, १/२ टीस्पून तिखट, चिमूटभर हिंग, १/४ कप पाणी, २ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन, तळण्यासाठी तेल.

Sakal

पीठ आणि मसाले मिक्स करा

मैद्यामध्ये जीरे आणि ओवा हातावर चोळून घाला. त्यात हळद, तिखट, मीठ आणि हिंग घालून नीट मिक्स करा.

Sakal

कडकडीत मोहन

तयार मिश्रणात कडकडीत गरम तेलाचे मोहन (Hot Oil Moen) घालून हाताने व्यवस्थित मिक्स करा. नंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या.

Sakal

लाटा आणि काप करा

पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर पिठाचे गोळे करून त्याची जाडसर गोलाकार पोळी लाटा. कापणीच्या साहाय्याने त्याला शंकरपाळ्याचा आकार (Diamond Shape) द्या.

Sakal

मध्यम आचेवर तळणे

कढईत तेल तापल्यावर मध्यम आचेवर (Medium Flame) शंकरपाळे सोनेरी रंगावर तळून घ्या. यामुळे ते आतून आणि बाहेरून खुसखुशीत होतात.

Sakal

खारे शंकरपाळे तयार!

तयार झालेले गरमागरम खारे शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहेत. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि खुसखुशीतपणा टिकवून ठेवा!

Sakal

दिवाळी फराळ! तोंडात विरघळणारे खुसखुशीत चिरोटे रेसिपी

Chirote Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा