भांबवडे...भांबुर्डा ते शिवाजीनगर! पुण्याच्या या गजबजलेल्या भागाचा इतिहास माहीतीये का?

सकाळ डिजिटल टीम

८ व्या शतकातील प्राचीन वस्ती

पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या आजच्या शिवाजीनगर परिसराचा इतिहास अत्यंत पुरातन असून ८ व्या शतकात येथील पाताळेश्वर लेणी कोरल्या गेल्यापासून या भागात वस्ती असल्याचे मानले जाते.

Shivajinagar Pune History

|

sakal 

मराठेशाहीतील 'भांबवडे' गाव

मुठा नदीपलीकडे पुणे आणि अलीकडे अवघे पन्नास घरे असलेले 'भांबवडे' हे छोटे गाव होते; जिथे आजच्या जंगली महाराज रोडच्या जागी घनदाट जंगल आणि फळांच्या बागा होत्या.

Shivajinagar Pune History

|

sakal 

शिवरायांचा गुप्त तळ आणि शिरोळे घराणे

शाहिस्तेखानावरील हल्ल्यावेळी मावळ्यांचे घोडे येथील रोकडोबा मंदिरासमोर बांधले होते; शिरोळे घराण्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना या गावाची पाटीलकी दिली होती.

Shivajinagar Pune History

|

sakal 

पेशवाईतील प्रसिद्ध गुरांचा बाजार

पेशव्यांच्या काळात येथे वस्ती वाढली आणि आजच्या मनपा इमारतीच्या परिसरात बुधवार व रविवारी जनावरांचा मोठा बाजार भरत असे, तर काँग्रेस भवन व बालगंधर्व भागात चाऱ्याच्या उंच गंजी असायच्या.

Shivajinagar Pune History

|

sakal 

इंग्रजांमुळे पडले 'भांबुर्डा' नाव

ब्रिटिशांना 'भांबवडे' असा उच्चार करता येत नसल्याने त्यांनी या गावाचा अपभ्रंश 'भांबुर्डा' असा केला; तसेच पूल, रेल्वे स्टेशन आणि इंजिनिअरिंग कॉलेज उभारून या भागाला पुण्याशी जोडले.

Shivajinagar Pune History

|

sakal 

फर्ग्युसन कॉलेज आणि जंगली महाराज रोड

शिक्षण संस्थांच्या विस्तारासाठी शिरोळे पाटलांनी १८८५ मध्ये नाममात्र भाड्याने मोठी जमीन दिल्याने फर्ग्युसन महाविद्यालय आणि सव्‍‌र्हण्ट्स ऑफ इंडिया सारख्या संस्था उभ्या राहून जंगली महाराज रस्ता आकाराला आला.

Shivajinagar Pune History

|

sakal 

करपे तलावाच्या नामांतराचा वाद

नगरपालिकेसमोरच्या करपे तलावाचे नाव 'शिवाजी तलाव' करण्यावरून आचार्य अत्रेंनी मोठा लढा दिला; मात्र पाच हजारांच्या देणगीमुळे पक्षश्रेष्ठींनी विरोध केल्याने तलावाचे नामांतर रखडले.

Shivajinagar Pune History

|

sakal 

अत्रेंनी केले अख्ख्या भागाचे नामकरण

तलावाचे नामांतर रोखले गेल्याची खंत मनात ठेवून स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यावर आचार्य अत्रेंनी थेट अख्ख्या भांबुर्डा गावाचेच नामांतर करून 'शिवाजीनगर' असे केले.

Shivajinagar Pune History

|

sakal 

आधुनिक पुण्याचा गजबजलेला चेहरा

अत्रेंनी संभाजी पार्क व शिवाजी आखाडा उभारून या भागाचा कायापालट केला; आज जुने इराणी कॅफे ते आधुनिक मेट्रो असा संगम जपत शिवाजीनगर पुण्याचा दागिना म्हणून ओळखले जाते.

Shivajinagar Pune History

|

sakal 

इंग्रजांची गुलामी कधीही न करणारे एकमेव भारतीय राज्य कोणते?

Indian State Was Never Under British Rule

|

sakal 

आणखी वाचा