Payal Naik
भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’ व ‘फू बाई फू’ सारख्या कार्यक्रमांतून घराघरात पोहोचले.
त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांच्या टायमिंगशी बरोबरी कुणीच करू शकत नाही.
भाऊ कदम यांना तीन मुली असून संचिता, समृद्धी व मृण्मयी अशी त्यांची नावे आहेत.
मात्र आपण आपल्या मुलींच्या लग्नात जाणार नसल्याचं भाऊंनी सांगितलं.
बापाला काय वाटतंते म्हणाले, “एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं आणि ती सासरी जाते, तेव्हा त्या मुलीच्या बापाला काय वाटतं हे एका मुलीसाठी ठीक आहे, पण माझ्या तर तीन मुली आहेत.
मला तर वाटणारच नाही की, त्यांनी कधी जावं. त्यांनी कायम माझ्या जवळच राहावं असंच मला वाटतं. त्या कुठे गेल्या नाही पाहिजेत.”
“त्यांच्या लग्नात काय होईल माहीत नाही. त्यांच्या लग्नात मी एक तर नाटकाला तरी जाईन किंवा शूटिंगला तरी जाईन किंवा मी कुठे तरी बिझी (व्यग्र) आहे असं म्हणेन”.
“मग नंतर हवं तर त्यांच्या घरी (सासरी) जाईन. त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात कधी कधी असं येतं की, मी तो विचारच करत नाही. त्यामुळे मी मुलींच्या लग्नाचा विचारच करू शकत नाही”
विनोदी कार्यक्रमांबरोबरच ते ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही झळकले आहेत.
एक फुटाच्या टेबलमुळे गेलेला अभिनेत्याचा ५ वर्षाच्या लेकराचा जीव; शेतात केलेले अंत्यसंस्कार