सकाळ डिजिटल टीम
दर वर्षी दिवाळीच्या पाच दिवसाच्या उत्सवात भाऊबीज हा सण देखील साजरा केला जातो. या सणाचा इतिहास आणि महत्व काय आहे जाणून घ्या.
Bhau Beej
sakal
भाऊबीज हा उत्सव कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो आणि याला यमद्वितीया असेही म्हणतात. हा सण प्रामुख्याने यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांच्या प्रेमकथेमुळे सुरू झाल्याचे म्हंटले जाते.
Bhau Beej
sakal
भाऊबीज सणाची सुरुवात सूर्यपुत्र यमराज (मृत्यूची देवता) आणि त्यांची जुळी बहीण यमुना (पवित्र नदी) यांच्या कथेवर आधारित आहे.
Bhau Beej
sakal
यमुना नेहमी यमाला आपल्या घरी जेवण करण्यासाठी बोलावित असे. यमराज कामात व्यस्त असल्याने टाळाटाळ करत असे, पण अखेरीस त्याने बहिणीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.
Bhau Beej
sakal
कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराजाने बहिणीच्या भेटीला जाताना नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरती मुक्तता दिली. आशी धार्मिक श्रद्धा आहे.
Bhau Beej
sakal
यमराज घरी आल्यावर यमुनेने त्याचे मोठ्या आनंदाने स्वागत केले, औक्षण केले आणि त्याला गोडधोड भोजन दिले.
Bhau Beej
sakal
यमराजाने यमुनेला तथास्तु असे वरदान दिले. तेव्हापासून बहीण-भावाच्या नात्याचा हा उत्सव यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.
Bhau Beej
sakal
हा सण बहीण आणि भावामधील अटूट प्रेम, स्नेह आणि विश्वासाचे प्रतीक आहे. बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो.
Bhau Beej
sakal
औक्षण झाल्यावर भाऊ बहिणीला प्रेमाने ओवाळणी म्हणून पैसे, वस्त्र किंवा एखादी वस्तू भेट देतो, जो तिच्याप्रती असलेला आदर आणि प्रेम दर्शवतो.
Bhau Beej
sakal
Top 5 Zodiacs Dear to Maa Lakshmi
Sakal