Yashwant Kshirsagar
भाऊचा धक्का हे बंदर मुंबईच्या पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर असलेला घाट आहे. या बंदरावर रोज अनेक जहाजे येतात, त्यात माल भरला जातो, उतरवला जातो, लोक पण जहाजाने बोटीने प्रवास करतात.
हा धक्का म्हणजे बंदर आता १७५ वर्षाचे झाले आहे असून ते भाऊ अजिंक्य लक्ष्मण यांच्यासह डॉ.भाऊ दाजी लाड यांच्या पुढाकाराने दिग्गजांनी बांधले.
भाऊ अजिंक्य लक्ष्मण यांनी इंग्रजांची नोकरी सोडून कंपनी स्थापन केली आणि समुद्रात भराव टाकण्याचे कंत्राट मिळवले.
मुंबई बंदरावर उतरताना प्रवाशांचे खूप हाल होतात, प्रवाशी आणि माल वाहतुकीसाठी असं धक्का उभारणं किती गरजेचं आहे हे भाऊंनी पटवून दिलं
बंदर ऊभारणीसाठी पर्यावरण भरती ओहोटी यांचं बारकाईने अभ्यास करून भाऊनी तो ब्रिटीश राजवटीतील शासनाला सादर केला
त्याकाळी भाऊंनी दिड लाखाचे कर्ज 6% चक्रवाढ व्याजाने घेतले आणि चार वर्षात बंदर पूर्ण केले.
भाऊंच्या कामाचा वेग पाहून हे बंदर भाऊंना ५० वर्षे मक्त्याने ब्रिटीश सरकारने दिले.
गव्हर्नर कारनॅक यांचे नाव त्या बंदराला द्यावे असे भाऊंनीच सुचविले होते, ते दिलेही पण आजही ते भाऊचा धक्का म्हणूनच ओळखले जाते.