Yashwant Kshirsagar
भेंडी आरोग्यास फायदेशीर असते तसेच अनेक लोकांना भेंडीची भाजी आवडते.
अनेक लोक भेंडीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार बनवून खातात
भेंडीमध्ये अनेक पोषक घटक आहेत. जसं की, व्हिटामिन, कॅल्शियम, लोह, फायबर, फॉस्फरस, फायबर इ.
पण काही पदार्थांसोबत भेंडी खाणे टाळले पाहिजे, नाहीतर आरोग्यास नुकसान होऊ शकते.
भेंडीच्या शिरांमध्ये एक प्रकारचा नैसर्गिक यौगिक आॅक्सलेट असते जे कॅल्शिममध्ये मिसळून किडनी स्टोन तयार करु शकते.
चला तर मग जाणून घेऊया काही अशा द्रव्य पदार्थांबाबत जे भेंडीसोबत खाणे टाळले पाहिजेत.
भेंडी खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण वाढू लागते. ज्यामुळे मुतखड्याची समस्या उद्भवू शकते.
भेंडी आणि मुळा एकत्र खाऊ नये यामुळे पोटात गॅस आणि पोटफुगी होते तसेच अपचन आणि अॅसिडिटीची समस्या देखील होऊ शकते.
भेंडी खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यायल्याने पचन मंदावते आणि जे काही खाल्ले आहे ते पचनास उशीर लागतो.
हा लेख केवळ सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.