सकाळ डिजिटल टीम
सोलापुरात भारतरत्न, महामानव, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी निघालेल्या मिरवणुकीत विविध मंडळांनी देखावे सादर केले. यातून बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करण्यात आला.
बुधवार पेठेतील रमांजली मंडळाने महिला सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न असा देखावा सादर केला. यात २५ डिसेंबर १९२७ रोजी बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन स्त्री मुक्ती दिन केला, असा संदेश दिला. यात मशाल हाती धरलेला महिला व अन्य पुतळे मोहक होते.
विश्वशांती विहार कबीरा सोशल फाउंडेशनचा मुकनायकचा देखावा.
प्रतिष्ठानने बाबासाहेबांचे विविध पैलू देखाव्यातून उलगडले. यात व्हायोलिन वाजवणारे बाबासाहेब, बॅरीस्टर बाबासाहेब, वृत्तपत्र वाचणारे बाबासाहेब अशी विविध रुपे सादर केले.
न्यू बुधवार पेठेतील आनंद बौद्ध मंडळाने साताऱ्याच्या जिल्हा परिषद संचलित श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलचे छायाचित्र असलेला देखावा सादर केला. यात बाबासाहेबांनी वंचितांना शिक्षण प्रवाहात आणल्याचा संदेश दिला. या शाळेची स्थापना १८५१ साली झाली आहे.
मिलिंद नगरातील डी. के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा धम्म प्रसार करणारे बाबासाहेब.
या मंडळाने आपल्या कंटेनरवर महिला सन्मान हा देखावा सादर केला. यातून त्यांनी आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रभागी असल्याचे दर्शवले. या संधी बाबासाहेबांमुळे मिळाल्याचे म्हटले.
आम्रपाली मंडळाने बुध्द धम्माचा प्रसार प्रचार कसा झाला याचे सादरीकरण केले. यात २१४० वर्षांनी बाबासाहेबांनी बुद्ध धम्माला पुर्नस्थापित केले असा संदेश दिला.
संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संविधान जागृती करणारा हलता देखावा सादर करण्यात आला. भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदेशीर दस्तावेज आहे.
कस्तुरबा मार्केटजवळील मंडळाने पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था देखावा सादर केला. बाबासाहेबांनी पिचलेल्यांना प्रेमाचा हात देत कसे बाहेर काढले, हे दर्शवले.