सकाळ डिजिटल टीम
भीमाशंकर हे देशातील भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर घनदाट जंगलात हे मंदिर वसलेले आहे.
History of Bhimashankar
sakal
पश्चिम महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'भीमा' नदीचा उगम याच क्षेत्रात होतो. ही नदी येथून पुढे प्रवाहित होत जाऊन पंढरपूर येथे चंद्रभागा नावाने ओळखली जाते.
History of Bhimashankar
sakal
हे प्राचीन मंदिर सुमारे १२०0 वर्षे जुने असून काळ्या दगडांवर अतिशय सुंदर कोरीवकाम केले आहे. याच्या वास्तुकलेमध्ये नागर आणि हेमाडपंथी शैलीचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते.
History of Bhimashankar
sakal
१८ व्या शतकात नाना फडणवीस यांनी या मंदिराच्या मुख्य शिखराचा, सभामंडपाचा जिर्णोद्धार केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या संवर्धनासाठी सहकार्य केले.
History of Bhimashankar
sakal
मंदिरासमोर १७२९ मधील एक मोठी ब्राँझची घंटा आहे. १७३९ मध्ये वसईच्या युद्धात पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर चिमाजी अप्पांनी ही ऐतिहासिक घंटा मंदिराला अर्पण केली होती.
History of Bhimashankar
sakal
चिमाजी अप्पांनी अर्पण केलेल्या या विशेष घंटेवर येशू आणि मदर मेरीची शिल्पे कोरलेली आहेत, जो या ऐतिहासिक ठेव्याचा एक अनोखा भाग आहे.
History of Bhimashankar
sakal
भीमाशंकरच्या या घनदाट जंगलात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला 'शेकरू' प्रामुख्याने पाहायला मिळतो, ज्यासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे.
History of Bhimashankar
sakal
मंदिराजवळच 'गुप्त भीमाशंकर' आहे, जिथे भीमा नदी पुन्हा जमिनीतून वाहताना दिसते. तसेच १९८४ मध्ये या संपूर्ण परिसराला अधिकृतपणे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.
History of Bhimashankar
sakal
राजा राजा चोलांच्या 'या' मंदिरात दडलाय १,००० वर्षांपूर्वीचा हिशोब; दगडांवर कोरलंय अकाउंट बुक!
Brihadisvara Temple
sakal