Weekend Getaway Alert! भीमाशंकर एक परफेक्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन

Monika Shinde

भीमाशंकर

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील एक अप्रतिम हिल स्टेशन आहे. निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो.

Bhimashankar

|

Esakal

निसर्गरम्य सौंदर्य

घनदाट जंगलं, धुक्याने व्यापलेले डोंगर, आणि मधूनच ऐकू येणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे भीमाशंकरची सफर अविस्मरणीय ठरते. पावसाळ्यात तर इथला हिरवा गार नजारा डोळ्यांना सुखावतो.

Bhimashankar

|

Esakal

ट्रेकिंग आणि साहस

ट्रेकर्ससाठी भीमाशंकर हा एक स्वर्गच आहे. नागफणी पॉईंटचा ट्रेक, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आणि धबधबे पाहताना मन प्रसन्न होतं.

Bhimashankar

|

Esakal

धार्मिक महत्त्व

भीमाशंकर येथे भगवान शंकराचे एक ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे हे ठिकाण भक्तांसाठीही विशेष आकर्षण ठरते.

Bhimashankar

|

Esakal

भेट देण्याचा उत्तम काळ

जुलै ते फेब्रुवारी हा काळ सर्वात सुंदर असतो. पावसाळ्यात धबधबे आणि धुक्याने वेढलेले दृश्य मोहक दिसते, तर हिवाळ्यात वातावरण थंडगार असते.

Bhimashankar

|

Esakal

कसे पोहोचाल?

पुण्याहून सुमारे 110 किमी अंतरावर असलेले भीमाशंकर बस, कार किंवा बाईकने सहज पोहोचता येते. मुंबईहून सुमारे 210 किमी प्रवास आहे.

Bhimashankar

|

Esakal

जवळची पर्यटन स्थळे

हनुमान तलाव, नागफणी पॉईंट, भीमा नदीचा उगम आणि लोनावळा आणि माळशेजला ही भेट देऊ शकता.

Bhimashankar

|

Esakal

हिरवळीपासून समुद्रापर्यंत: दक्षिण भारत एक्सप्लोर करा

येथे क्लिक करा