Aarti Badade
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' साजरी केली जाते. हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्या एकत्र करून बनवलेली ही मिश्र भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते.
Bhogi Bhaji Recipe
Sakal
ओल्या तुरीचे दाणे, पावटा, हरभरा, मटार, गाजर, घेवडा, वांगी, बटाटा, बोरं आणि उसाचे तुकडे; या सर्व हिवाळी भाज्या एकत्र करा.
Bhogi Bhaji Recipe
Sakal
सुरुवातीला कढईत थोडे तेल आणि मीठ टाकून सर्व भाज्या व्यवस्थित परतून घ्या. यामुळे भाज्यांचा कच्चेपणा जातो आणि भाजीला छान चव येते.
Bhogi Bhaji Recipe
Sakal
लसूण, मिरची, सुके खोबरे, तीळ, खसखस, धणे आणि जिरे एकत्र वाटून एक खमंग पेस्ट तयार करा. ही पेस्ट भाजीला दाटसरपणा आणि चव देते.
Bhogi Bhaji Recipe
Sakal
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कांदा घालून परता. कांदा गुलाबी झाला की त्यात तयार केलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता.
Bhogi Bhaji Recipe
Sakal
मसाल्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घाला. त्यानंतर टोमॅटो टाकून मंद आचेवर झाकण ठेवून हा मसाला चांगला शिजू द्या.
Bhogi Bhaji Recipe
Sakal
आता मसाल्यात परतलेल्या भाज्या मिसळा. गरजेनुसार गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून भाजीला चांगली उकळी येऊ द्या.
Bhogi Bhaji Recipe
Sakal
तयार झालेली भोगीची भाजी वरून भरपूर कोथिंबीर आणि तीळ लावून सजवा. तिळाच्या बाजरीच्या भाकरीसोबत या भाजीचा आस्वाद घ्या!
Bhogi Bhaji Recipe
Sakal
मकर संक्रांती स्पेशल! आजीच्या हातची चव देणारी अस्सल तिळगुळ पोळी रेसिपी
Tilgul Poli recipe
Sakal