हिवाळा स्पेशल! ताईनो अशी बनवा झणझणीत पांढऱ्या तिळाची चटणी!

Aarti Badade

थंडीसाठी पौष्टिक मेजवानी

थंडीच्या दिवसांत तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असून, ही पांढऱ्या तिळाची चटणी भाकरी किंवा चपातीसोबत चविष्ट लागते.

Sesame seeds Chutney

|

Sakal

आवश्यक साहित्य

यासाठी १ कप पांढरे तीळ, अर्धा कप शेंगदाणे, १०-१५ सुक्या लाल मिरच्या, लसूण आणि चवीनुसार मीठ तयार ठेवा.

Sesame seeds Chutney

|

Sakal

तीळ-शेंगदाणे भाजून घ्या

कढईत तीळ आणि शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजून घ्या; तीळ तडतडू लागले आणि सोनेरी झाले की ते काढून थंड करा.

Sesame seeds Chutney

|

Sakal

वाटणाची पूर्वतयारी

भाजलेले तीळ-शेंगदाणे थंड झाल्यावर त्यात लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि मीठ एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात घ्या.

Sesame seeds Chutney

|

Sakal

गुळगुळीत पेस्ट तयार करा

मिश्रणात आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून त्याची बारीक आणि गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या.

Sesame seeds Chutney

|

Sakal

चव वाढवण्यासाठी खास टीप

चटणीला आंबट-गोड चव हवी असल्यास त्यात थोडी भिजवलेली चिंच आणि जिरे घातल्यास चव द्विगुणित होते.

Sesame seeds Chutney

|

Sakal

नारळाचा ट्विस्ट

जर तुम्हाला ही चटणी अधिक दाट हवी असेल, तर वाटताना त्यात थोडे सुके किंवा ओले खोबरे किसून घातल्यास छान लागते.

Sesame seeds Chutney

|

Sakal

कोणासोबत खावी?

ही चटणी तुम्ही बाजरीची भाकरी, चपाती किंवा इडली-डोशासोबत गरमागरम सर्व्ह करून जेवणाचा आनंद घेऊ शकता.

Sesame seeds Chutney

|

Sakal

मकर संक्रांती स्पेशल! आजीच्या हातची चव देणारी अस्सल तिळगुळ पोळी रेसिपी

Tilgul Poli recipe

|

Sakal

येथे क्लिक करा