पांढरीशुभ्र वाळू अन् निळ्याशार पाणी... सिंधुदुर्गमधील भोगवे समुद्रकिनारा

Pranali Kodre

स्वच्छ आणि आगळ्यावेगळा समुद्रकिनारा

कोकणातील स्वच्छ आणि आगळ्यावेगळ्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये भोगवेचा समावेश होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावात हा समुद्रकिनारा आहे.

Bhogwe Beach

|

Sakal

भोगवे गाव

देवबाग येथे समुद्राला जाऊन मिळणाऱ्या कर्ली नदीच्या मुखाशी भोगवे गाव आहे. येथील समुद्रकिनारा मन मोहून टाकणारा आहे.

Bhogwe Beach

|

Sakal

भोगवे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य

पांढरीशुभ्र वाळू आणि गडद निळ्या रंगाचे पाणी यामुळे या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणखीच विलोभनीय दिसते. सुर्यास्तावेळी येथील या समुद्रकिनाऱ्याचे सौर्दर्य अधिकच खुलते.

Bhogwe Beach

|

Sakal

पर्यटनासाठी उत्तम कालावधी

उन्हाळा आणि हिवाळ्यात, म्हणजेच साधारण जानेवारी ते मे दरम्यानचा कालावधी येथे पर्यटनासाठी उत्तम आहे.

Bhogwe Beach

|

Sakal

समुद्रस्नानाचाही आनंद

समुद्रस्नानाचाही येथे आनंद घेता येतो, पण पर्यटकांनी सुचनांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.

Bhogwe Beach

|

Sakal

'सायबाची काठी'

भोगवेजवळ डोंगरकिनाऱ्यावर 'सायबाची काठी' हे आणखी एक पर्यटन स्थळ आहे.

Bhogwe Beach

|

Sakal

जवळचे स्थानके

भोगवेला जाण्यासाठी कुडाळ जवळचे रेल्वेस्थानक असून मालवण आणि वेंगुर्ले जवळचे बसस्थानक आहे. वेंगुर्ल्याहून बागायत मार्गे भोगवेला जाता येते.

Kudal Railway Station

|

Sakal

निवासाची आणि भोजनाची व्यवस्था

भोगवेला जाण्यासाठी एसटी बस आहेत, पण त्या मर्यादीत आहेत, त्यामुळे खासगी वाहन असणे सोयीचे ठरते. भोगवेमध्ये पर्यटकांना निवासासाठी आणि भोजनासाठी पर्याय उपलब्ध आहेत.

Bhogwe Beach

|

Sakal

सिंधुदुर्गमधील सर्वात मोठा 'धामापूर तलाव'; बोटिंगचाही घेता येतो आनंद

Dhamapur Lake, Sindhudurg

|

Sakal

येथे क्लिक करा