Sandip Kapde
भूषणगड किल्ला सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असून तो मैदानी प्रदेशातील एकमेव डोंगरावर वसलेला आहे.
Bhushangad Fort
esakal
या गडावर असलेली हरणाई देवी नवसाला पावणारी म्हणून संपूर्ण परिसरात प्रसिध्द आहे.
Bhushangad Fort
esakal
देवगिरीचा राजा सिंघण दुसरा यांनी इ.स. १२१० ते १२४७ दरम्यान भूषणगडचा किल्ला बांधला.
Bhushangad Fort
esakal
इ.स. १६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली.
Bhushangad Fort
esakal
औरंगजेबाने नंतर हा किल्ला जिंकून त्याचे नाव ‘इस्लामतारा’ असे ठेवले.
Bhushangad Fort
esakal
पेशवेकाळात भूषणगड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता, तर इंग्रजांनी इ.स. १८४८ मध्ये त्यावर कब्जा मिळवला.
Bhushangad Fort
esakal
भूषणगडचा चढाव पायऱ्यांनी केलेला असून गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस दिसतात.
Bhushangad Fort
esakal
प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे असून त्याच्या आजूबाजूचे बुरुज आजही सुस्थितीत आहेत.
Bhushangad Fort
esakal
गडावर हरणाई देवीचे जिर्णोद्धारित मंदिर, महादेवाचे छोटे मंदिर आणि सिध्दनाथाची मूर्ती पाहायला मिळते.
Bhushangad Fort
esakal
भूषणगडची संपूर्ण फेरी साधारण एका तासात पूर्ण होते आणि शेवटी आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी पोहोचतो.
Bhushangad Fort
esakal
Ajoba Fort
esakal