'या' देशामध्ये एकही मशीद नाही, कारण काय?

संतोष कानडे

भूतान

भारताचा शेजारी देश असलेला भूतान हा जगातील असा एक देश आहे, जिथे एकही अधिकृत मशीद अस्तित्वात नाही.

बौद्ध राष्ट्र

भूतान हे संविधानानुसार अधिकृतपणे वज्रयान बौद्ध राष्ट्र असून, बौद्ध धर्म हा त्यांचा 'आध्यात्मिक वारसा' मानला जातो.

हिंदू

देशातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७५ ते ८० टक्के जनता बौद्ध धर्मीय आहे, तर उर्वरित बहुतांश लोकसंख्या हिंदू धर्माचे पालन करते.

मुस्लिम

भूतानमध्ये मुस्लिम समुदायाची लोकसंख्या अत्यंत नगण्य असल्याने तेथे स्वतंत्र मशिदीची मागणी किंवा गरज निर्माण झाली नाही.

संस्कृती

भूतानचे कायदे पारंपरिक संस्कृती आणि बौद्ध वास्तुकलेचे जतन करण्यासाठी अत्यंत कडक असून, कोणत्याही नवीन धार्मिक स्थळाच्या बांधकामासाठी राजा आणि सरकारची विशेष परवानगी लागते.

कायद्याने बंदी

भूतानमध्ये इतर कोणत्याही धर्माच्या प्रसारावर कायद्याने पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

सरकारी परवाने

देशात कोणत्याही नव्या बिगर-बौद्ध धार्मिक वास्तूंच्या उभारणीसाठी सरकारी परवाने मिळणे अतिशय कठीण असते.

नमाज पठण

भूतानमध्ये राहणारे मोजके स्थानिक मुस्लिम, व्यापारी किंवा परदेशी लोक सार्वजनिक मशिदींऐवजी आपापल्या घरांमध्ये किंवा खाजगी जागेत नमाज पठण करतात.

बौद्ध जीवनशैली

राष्ट्रीय एकात्मता आणि 'ग्रॉस नॅशनल हॅपिनेस' अंतर्गत भूतान आपल्या बौद्ध जीवनशैली आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याला सर्वोच्च प्राधान्य देतो.

इस्लाम

इस्लाम धर्मावर थेट कोणतीही बंदी नसली तरी, नगण्य लोकसंख्या आणि कडक सांस्कृतिक नियमांमुळे भूतानच्या संपूर्ण भूभागावर एकही सार्वजनिक मशीद उभारली गेलेली नाही.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी पुढे काय केलं?

aurangzeb

|

esakal

येथे क्लिक करा