संतोष कानडे
औरंगजेब क्रूर होता, कंजूष होता. पण त्यालाही प्रेम आणि दुःख कळलं. त्यातूनच बीबी का मकबऱ्याचा जन्म झाला.
दिलरास बानू ही इराणची राजकुमारी होती. ती औरंगजेबाची लाडकी बेगम होती. तिच्या मृत्यूनं बादशाह खूप दुःखी झाला. तिच्या आठवणीत त्याने भव्य काहीतरी बांधायचे ठरवले.
औरंगजेब तत्कालीन औरंगाबादमध्ये राहत होता. तिथेच मकबऱ्याचे नकाशे तयार झाले. त्याचे नाव बीबी का मकबरा ठेवले.
ताजमहालच्या आर्किटेक्टचा मुलगा अताउल्लाह आणि इंजिनियर हसपतराय यांनी हे काम घेतले. त्यांना ताजपेक्षा सुंदर इमारत बांधायची होती.
नक्शे पाहून औरंगजेबाने पहिला प्रश्न विचारला: "किती खर्च येईल?" उत्तर आले: "१० कोटी!" औरंगजेब म्हणाला: "फक्त ३ लाख देतो!"
ताजमहालसारखी इमारत बनवण्याचे स्वप्न तुटले. पण दिलरासच्या आठवणींसाठी जेवढे जमेल तेवढे सुंदर बांधायचं ठरले.
शेवटी, फक्त साडेतीन लाख नव्हे, तर तब्बल सात लाख रुपये खर्च झाले! आजही बीबी का मकबरा संभाजीनगरची शान आहे.
औरंगजेबाचे शेवटचे ठिकाण ‘खुलताबाद’ येथे आहे. ते बीबी का मकबऱ्याजवळच आहे. याचा अर्थ त्याला प्रेम नव्हते असे नाही.
बीबी का मकबरा ही ताजमहालची छोटी प्रतिकृती आहे. तरीही त्याचे सौंदर्य आजही डोळ्यात भरते. ताजप्रमाणेच ही सुद्धा एक दुःखाची कहाणी आहे.