बिडवई म्हणजे नेमकं कोण? शिवकालीन बाजारपेठेत त्याचं काम काय होतं?

Sandip Kapde

ओळख

बिडवई हा शिवकालीन पेठेच्या व्यवस्थेतील महत्त्वाचा अधिकारी असून त्याच्यावर पेठेची भरभराट करण्याची जबाबदारी असे.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

पत्र

जिजाबाई साहेबांच्या २ जानेवारी १६५७ रोजीच्या पाषाण येथील जिजापूर पेठेसंबंधीच्या पत्रात पेठेतील विविध अधिकाऱ्यांची नोंद आढळते.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

व्यवस्था

या पत्रात शेटेपण, महाजनपण, बिडवईपण, कोतवालकी, मेहतरकी, डबहलकी, खुम आणि पानसरकी अशा जबाबदाऱ्यांचा उल्लेख आहे.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

बिडवई

या व्यवस्थेतील बिडवईचे प्रमुख काम पेठेत व्यापारी आणि व्यावसायिकांना आकर्षित करून व्यापार वाढवणे हे होते.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

व्यापारी

नवीन व्यापारी पेठेत यावेत आणि तिथे स्थायिक व्हावेत, यासाठी बिडवई प्रयत्न करत असे.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

जकात

पेठेत येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जकात आकारली जात असून तिच्या वसुलीतही बिडवईची भूमिका होती.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

मामुरी

ऐतिहासिक पत्रात बिडवईने पेठेची ‘मामुरी’ करावी, म्हणजेच पेठेची भरभराट आणि व्यवस्था पाहावी, असा उल्लेख आढळतो.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

अधिकार

बिडवईपण काही ठिकाणी मिरासी स्वरूपात दिले जात असल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांतून दिसून येते.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

सहकार्य

शेटे आणि महाजन यांच्यासह बिडवई हा पेठेच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक होता.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

महत्त्व

थोडक्यात, व्यापारी आणणे, जकात वसुलीला चालना देणे आणि पेठेची भरभराट घडवून आणणे हे बिडवईचे महत्त्वाचे कार्य होते.

Who Was Bidwai in Shivaji Maharaj’s Era?

|

esakal

विश्वासराव पेशवे दिल्लीचे बादशहा झाले होते? लाल किल्ल्यात काय घडलं होतं? 

Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760

|

esakal

येथे क्लिक करा