Sandip Kapde
दि. १४ मार्च १७६० रोजी श्रीमंत सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी उत्तर हिंदुस्थानच्या मोहिमेसाठी कूच केले.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
मराठी सैन्याने बुऱ्हाणपूर, भोपाळ, सीरोंज, ओर्च्छा, नरवर आणि ग्वाल्हेर असा कठीण प्रवास करत दिल्लीच्या दिशेने प्रस्थान केले.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
या मोहिमेत विश्वासरावांच्या अधिपत्याखाली स्वतंत्रपणे सुमारे दहा हजारांची मराठी फौज कार्यरत होती.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
दि. २ ऑगस्ट १७६० रोजी मराठ्यांनी दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला काबीज केला.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
या विजयाच्या आनंदात सदाशिवरावभाऊंनी खास दरबार भरवून सरदारांना विश्वासरावांना मुजरे आणि नजराणे स्वीकारण्यास सांगितले.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
दरबारानंतर विश्वासरावांनी लाल किल्ल्याची लष्करीदृष्ट्या सखोल पाहणी केली.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
या घटनेचा विपर्यास करून नजीबखान रोहिल्याने विश्वासराव दिल्लीचे बादशहा झाल्याची खोटी अफवा पसरवली.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
उत्तर भारतातील राजे आणि संस्थानिकांना मराठ्यांविरुद्ध भडकवणे हा या अफवेमागचा नजीबखानाचा मुख्य उद्देश होता.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
हा धोका ओळखून सदाशिवरावभाऊंनी अत्यंत दूरदृष्टीने मुघल बादशहा अलीगौहरचा पुत्र जवानबख्त याला दिल्लीच्या तख्तावर बसवले.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
या निर्णयातून मराठ्यांचे उद्दिष्ट मुघल सत्ता बळकावणे नसून दिल्लीसह उत्तर भारतात स्थैर्य निर्माण करणे असल्याचे स्पष्ट झाले.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
सन १७६० चा दसरा मराठ्यांनी कुंजपुऱ्यात विश्वासरावांच्या नेतृत्वाखाली मोठ्या दिमाखात साजरा केला.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
विश्वासराव दिल्लीचे बादशहा झाले नव्हते; लाल किल्ला जिंकल्यानंतर झालेल्या दरबारातील सन्मान आणि पाहणीचा विपर्यास करून ही अफवा पसरवण्यात आली होती.
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal