'बिग बॉसच्या घरात सलमानशी धादांत खोटं बोलतो अभिषेक बजाज' एक्स पत्नीने गंभीर आरोप

Aarti Badade

अभिषेक बजाज चर्चेत

बिग बॉसच्या सध्याच्या सीझनमध्ये अभिनेता अभिषेक बजाज सतत त्याच्या वादांमुळे आणि असामान्य वर्तनामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

Sakal

वैयक्तिक आयुष्यावर वाद

शोमधील वादानंतर आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरूनही नवा वाद पेटला आहे; कारण त्याने वैवाहिक आयुष्याबद्दल चुकीची माहिती दिल्याची चर्चा आहे.

Sakal

पूर्वपत्नीचे थेट आरोप

अभिषेकची पूर्वपत्नी आकांक्षा जिंदल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिषेकवर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत.

Sakal

'खोटं बोलणं हेच सत्य'

आकांक्षाने लिहिले, "तो नेहमीच चांगलं असल्याचं नाटक करतो आणि लोकांना जे ऐकायचं असतं तेच सांगतो; पण खोटं बोलणं हेच त्याचं वास्तव आहे."

Sakal

घटस्फोटाचं कारण

ती पुढे म्हणाली, "खोटं बोलणं हेच आमच्या घटस्फोटाचं कारण ठरलं." तसेच, तो वयापासून वैवाहिक आयुष्यापर्यंत सर्व गोष्टींबाबत दिशाभूल करत आहे.

Sakal

सलमान खानसमोरही खोटं?

आकांक्षाने असाही आरोप केला की, "तो सलमान खानसमोरही कोणतीही संकोच न बाळगता खोटं बोलतो" आणि शोमध्येही तोच खेळ खेळतो आहे.

Sakal

अभिषेकची प्रतिक्रिया

या गंभीर आरोपांवर अभिनेता अभिषेक बजाजने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही; मात्र सोशल मीडियावर या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sakal

पारंपरिक साडीमध्येही मृणाल ठाकूर दिसते फॅशन आयकॉन! तिचा स्टाईल मंत्र जाणून घ्या!

Mrunal Thakur's Golden Saree Festive look

|

Sakal

येथे क्लिक करा