रोहित कणसे
बिग बॉस मराठी सीझन पाच सध्या जोरात सुरू आहे, यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होते आहे.
बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये अभिनेते महेश मांजरेकर यांच्या जागी बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख हा रिॲलिटी शो होस्ट करत आहे.
तर निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर ते वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल हे सगळे स्पर्धक खेळातू भरपूर मनोरंजन देत आहेत.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे स्पर्धक दर आठवड्याला किती फी घेतात आणि या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण आहे? चला जाणून घेऊया.
बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू असते ती निक्की तांबोळीची, मीडिया रिपोर्टनुसार निक्की ही दर आठवड्याल ३.७५ लाख इतकी फी घेत.
दोन नंबरला अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा नंबर लागतो, त्या दर आठवड्याला २.५ लाख इतकी फी आकारतात.
काही दिवसांपासून चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आलेला अरबाझ पटेल हा आठवड्याला ११.२५ लाख इतके पैसे घेतो.
तर गुलीगत धोका फेम सुरज चव्हाण याला आठवड्याचे २५ हजार रुपये दिले जातात.
यानंतर नंबर येतो धनंजय पोवार यांचा, इंस्टाग्राम, युट्यूबवर मोठा चाहता वर्ग असलेले पोवार यांना दर आठवड्याला ६० हजार रुपये इतकी फी मिळते.
तर योगिता चव्हाण १ लाख, जान्हवी किल्लेकर १ लाख, आर्या जाधव १ लाख, वैभव चव्हाण ७० हजार आणि घनश्याम दरोडे याला ५० हजार रुपये दर आठवड्याला दिले जातात.
पुरुषांसाठी वरदानचं आहे लवंग