Nitish Kumar नितीश कुमार २० वर्षात १० वेळा मुख्यमंत्री, ६ वेळा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा

सूरज यादव

नितीश कुमार मुख्यमंत्री

बिहारच्या मुख्यमंत्री पदी नितीश कुमार यांनी शपथ घेतली. नितीश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. पाच निवडणुकांत त्यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्राची शपथ घेतली.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

राजीनामा

नितीश कुमार यांनी शपथ घेण्याचा विक्रम केलाय. त्यासोबत त्यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीही रंजक आहेत. २० वर्षांच्या कार्यकाळात एकूण ९ वेळा राजीनामा दिलाय.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

२०००

नितीशकुमार ३ मार्च २००० ला पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. पण बहुमत सिद्ध करता न आल्यानं त्यांना १० मार्चला राजीनामा द्यावा लागला.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

२००५

बिहारमध्ये २४ नोव्हेंबर २००५ ला एनडीएला बहुमत मिळालं आणि त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. हा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर औपचारिकता म्हणून २०१०मध्ये राजीनामा दिला. २०१० मध्ये शपथ घेतल्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा राजीनामा दिला.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

२०१४-२०१५

२०१४ मध्ये राजीनाम्यानंतर २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी फेब्रुवारीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण एनडीएतून बाहेर पडल्यानं पुन्हा नोव्हेंबरमध्येच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पाचव्यांदा शपथ घेतली होती.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

२०१७

महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर दोन वर्षात पुन्हा एनडीएत आले तेव्हा २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी पाचव्यांदा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा जुलै २०१७ मध्ये मुख्यमंत्री बनले.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

२०२० - २०२२

नितीश कुमार २०२० मध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेतली. पण २०२२ मध्ये सहाव्यांदा राजीनामा देत पुन्हा एनडीएतून बाहेर पडले आणि महाआघाडीसोबत सरकार स्थापन करत आठव्यांदा शपथ घेतली.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

२०२४

नितीश कुमार २८ जानेवारी २०२४ ला पुन्हा महाआघाडीतून बाहेर पडले आणि राजीनामा दिला. त्यानंतर एनडीएसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. ही त्यांची नववी मुख्यमंत्रीपदाची शपथ होती.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

२०२५

आता २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं असून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दहाव्यांदा शपथ घेतली.

Nitish Kumar Take Oath As Bihar CM

|

Esakal

अमेरिकेनं अनमोल बिश्नोईसह २०० जणांना केलंय डिपोर्ट, पायात लावलंय GPS, डिजिटल पिंजरा माहितीय का?

What Is the Digital Cage Used by the US on Deportees

|

Esakal

इथं क्लिक करा