Shubham Banubakode
पैठणमधील नाथमंदिरजवळ राहणाऱ्या कावळे परिवाराकडे शिवरायांच्या काळातील मूळ हस्तलिखितांचा संग्रह आहे.
गेल्या ११ पिढ्यांपासून त्यांनी हा अमुल्य ठेवा जपून ठेवला आहे. आजही तितक्याच गांभीर्याने हा संग्रह जतन केलं जातो आहे.
या संग्रहात शिवाजी महाराज आणि कावळे परिवातील वंशजातील पत्रव्यवहाराचा समावेश आहे.
या संग्रहात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी स्वत: लिहिलेली काही दुर्मीळ पत्रे आहेत.
कावळे परिवाराने या हस्तलिखितांचा काही भाग स्व. बाळासाहेब पाटील यांच्या संग्रहालयात दिला आहे, तर उर्वरित पत्रे आजही त्यांच्याकडे सुरक्षित आहेत.
ही सर्व पत्र मोडी लिपीत असून प्रकाश कावळे यांनी तज्ज्ञांकडून या पत्रांचा मराठी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद करून घेतला आहे.
या संग्रहात शिवाजी महाराजांशिवाय मानकोजीराजे भोसले, शाहूराजे भोसले, मल्हारराव होळकर, भगवानराव राजे शिर्के यांचीही पत्रं आहेत.