बिल गेट्सच्या पणजोबांची कबर सोलापुरात कशी? जाणून घ्या संपूर्ण सत्य

Yashwant Kshirsagar

बिल गेट्सचे सोलापूरशी नाते?

नेटीव्ह ख्रिश्चन स्मशानभूमी ट्रस्टने दावा केला आहे की बिल गेट्स यांचे पणजोबा सॅम्युअल गेट्स हे ब्रिटीश काळात सोलापुरात आले होते आणि त्यांचे दफनही येथेच झाले.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

कोण होते सॅम्युअल गेट्स?

ट्रस्टच्या मते, रेव्ह. लॉरेन सॅम्युअल गेट्स हे मिशनरी म्हणून भारतात आले. ते सोलापुरात राहत होते आणि लेप्रसी कॉलनी येथील चर्च त्यांनी उभारला. आजही तो ‘गेट्स चर्च’ म्हणून ओळखला जातो.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

कसे झाले निधन?

त्यांनी सोलापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिशनरी कार्य केले. विजापूर येथेही त्यांचे वास्तव्य होते. ७ सप्टेंबर १९२२ रोजी विजापूर येथील दंगलीत ७७ वर्षांच्या सॅम्युअल गेट्स यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव सोलापुरात आणण्यात आले.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

दफन कुठे?

डॉ. हेजन यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मोदी स्मशानभूमी लगतच्या ख्रिश्चन स्मशानभूमीत त्यांना दफन करण्यात आले. तेथे कबर बांधण्यात आली होती.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

कबरीची सध्याची अवस्था

ट्रस्टचे संस्थापक अशोक ससाणे यांच्या मते, कबरीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मूर्ती आणि पितळी क्रॉस चोरीला गेले आहेत. संरक्षक भिंत अनेक ठिकाणी पडली आहे आणि काटेरी झुडुपांनी परिसर व्यापला आहे.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

शेजारील कबरीही दुर्लक्षित

सॅम्युअल गेट्स यांच्या कबरीशेजारी ब्रिटीश काळातील सोलापूरचे कलेक्टर गोल्डफिंच आणि मेरी बी. हार्डिंग (मेरी बी. हार्डिंग डी.एड. कॉलेजच्या संस्थापिका) यांच्या कबरी आहेत. त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

ट्रस्टची मागणी

अशोक ससाणे यांनी महापालिकेकडे लक्ष देण्याची आणि स्मशानभूमीची देखभाल करण्याची मागणी केली आहे.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

गेट्स परिवाराची वंशावळ

बिल गेट्स यांचा जन्म सिएटल, वॉशिंग्टन येथे झाला. वडील विल्यम एच. गेट्स (वकील) आणि आजोबा जे. डब्ल्यू. मॅक्सवेल (बँक अध्यक्ष) होते. अधिकृत नोंदींनुसार त्यांच्या पूर्वजांचा भारताशी किंवा सोलापूरशी कोणताही थेट संबंध आढळत नाही.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

दावा की वास्तव?

ही माहिती स्थानिक ट्रस्टने दिलेल्या दाव्यावर आधारित आहे. बिल गेट्स यांच्या अधिकृत वंशावळीत असा उल्लेख नसल्याने या दाव्याची स्वतंत्र पडताळणी आवश्यक आहे.

Bill Gates Solapur connectio

|

esakal

घरात जेवण करताना तोंड कोणत्या दिशेला असावं? जाणून घ्या नियम

Best Direction For Eating

|

esakal

येथे क्लिक करा