Shubham Banubakode
मुघल बादशहा अकबराच्या दरबारात गाजलेले बीरबल मध्य प्रदेशातील घोघरा गावचे होते. मात्र त्यांच्या गावाचं चित्र आजही फारसं बदललेलं नाही.
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal
महेशदास दुबे म्हणजेच बीरबल यांचा जन्म घोघरा गावात झाल्याचं सांगितलं जातं. याच मातीत त्यांचं बालपण गेल्याच्या आठवणी आजही जपल्या आहेत.
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal
बीरबलांची ३६ वी पिढी आजही घोघरा गावातच राहते. त्यांच्या वंशजांना मात्र उदरनिर्वाहासाठी शेती, मजुरी आणि छोट्या व्यवसायांचा आधार घ्यावा लागतो.
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal
बीरबलांच्या कुटुंबाकडे पूर्वी जुने दस्तऐवज आणि काही ऐतिहासिक वस्तू होत्या. मात्र काळाच्या ओघात अनेक गोष्टी नष्ट झाल्या आहेत.
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal
ज्या ठिकाणी बीरबलांचे आई-वडील राहत होते, तिथे आता घर उरलेलं नाही. तलावाजवळचा तो मोकळा टीला जुन्या इतिहासाची साक्ष देतो आहे.
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal
घोघऱ्यातील प्राचीन देवीचं मंदिर मात्र आजही उभं आहे. बीरबल इथे भावासोबत येत असत आणि देवीकडून त्यांना वरदान मिळाल्याची गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal
आजही गावात वीज आली नाही किंवा कामधंदा नसला की मंडळी निवांत बसतात. मग अकबर-बीरबलच्या जुन्या गंमती-जमतींच्या गप्पांना रंग चढतो.
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal
दरबारात बीरबलांना मान मिळाला, पण त्यांच्या जन्मगावाची उपेक्षा झाली. त्यामुळे घोघऱ्याला आजही विकासाचा हात देणाऱ्या एखाद्या ‘अकबर’ची प्रतीक्षा आहे.
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal