जगातील सर्वात महागडं सूप कोणतं? किंमत ऐकून थक्क व्हाल!

Shubham Banubakode

पक्ष्याच्या घरट्याचं सूप

पक्ष्याच्या घरट्यापासून सूप बनतं, हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. पण अनेक देशांमध्ये बर्ड्स नेस्ट सूप हा अतिशय खास आणि महागडा पदार्थ म्हणून ओळखला जातो.

Most Expensive Soup Made from Bird's Nest

|

esakal

लाळेचं घरटं

हे सूप स्विफ्टलेट नावाच्या पक्ष्याच्या घरट्यापासून बनवलं जातं. हा पक्षी काड्या किंवा गवत वापरत नाही. तो स्वतःच्या लाळेपासूनच घरटं तयार करतो.

Most Expensive Soup Made from Bird's Nest

|

esakal

किती असते किंमत?

या घरट्यांना जगभरात मोठी मागणी आहे. त्यामुळे त्याची किंमत तब्बल १.६ लाख ते ८ लाख रुपये प्रति किलो इतकी असू शकते.

Most Expensive Soup Made from Bird's Nest

|

esakal

घरटं गोळा कसं करतात?

स्विफ्टलेट पक्षी उंच कडे, खोल गुहा आणि समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर घरटं बांधतो. त्यामुळे ते गोळा करण्यासाठी लोकांना जीव धोक्यात घालून चढाई करावी लागते.

Most Expensive Soup Made from Bird's Nest

|

esakal

लाल घरट्याची किंमत किती?

या पक्ष्याच्या लाल रंगाच्या घरट्याला सर्वात जास्त किंमत मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १० हजार अमेरिकन डॉलर प्रति किलो इतकी जाऊ शकते.

Most Expensive Soup Made from Bird's Nest

|

esakal

प्रतिष्ठेचं प्रतिक

चीन, हाँगकाँग, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि फिलिपिन्ससारख्या देशांमध्ये हे सूप श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.

Most Expensive Soup Made from Bird's Nest

|

esakal

आरोग्यासाठी फायदेशीर?

हे सूप पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीराला ऊर्जा मिळते, त्वचा चांगली राहते आणि वाढतं वय लवकर दिसत नाही, असा अनेकांचा समज आहे.

Most Expensive Soup Made from Bird's Nest

|

esakal

सर्वात महागड्या पदार्थांपैकी एक

दुर्मिळता, घरटं गोळा करण्याची कठीण प्रक्रिया आणि मोठी मागणी यामुळे बर्ड्स नेस्ट सूप आजही जगातील सर्वात महागड्या खाद्यपदार्थांपैकी एक मानलं जातं.

Most Expensive Soup Made from Bird's Nest

|

esakal

सौरमालेच्या शेवटी काय दडलंय? NASA ने उलगडलं थक्क करणारं रहस्य!

solar

|

esakal

हेही वाचा -