सौरमालेच्या शेवटी काय दडलंय? NASA ने उलगडलं थक्क करणारं रहस्य!

Shubham Banubakode

उद्देश काय होता?

NASA ने 1977 मध्ये Voyager 1 आणि Voyager 2 ही अंतराळयाने अवकाशात पाठवली होती. गुरू आणि शनी ग्रहांचा अभ्यास करणं हा त्यामागचा उद्देश होता.

Interstellar Space Facts

|

esakal

सौरमालेच्या बाहेर प्रवेश

Voyager 1 ने 2012 मध्ये, तर Voyager 2 ने 2018 मध्ये हेलिओस्फिअर पार करत सूर्याच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पडून आंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला.

Interstellar Space Facts

|

esakal

हेलिओस्फिअर म्हणजे नेमकं काय?

सूर्य सतत सौरवारा (Solar Wind) बाहेर फेकत असतो. या कणांमुळे सौरमालेभोवती एक अदृश्य कवच तयार होतं. यालाच हेलिओस्फिअर म्हणतात.

Interstellar Space Facts

|

esakal

Voyager ला पुढे काय दिसलं?

हेलिओस्फिअरच्या बाहेर जाताच सूर्याच्या सौरवाऱ्याचं प्रमाण अचानक कमी झालं, तर बाहेरून येणाऱ्या Galactic Cosmic Rays चं प्रमाण वाढलं. त्यामुळे सूर्याचं संरक्षण कवच किती महत्त्वाचं आहे, याचा प्रत्यक्ष पुरावा मिळाला.

Interstellar Space Facts

|

esakal

उष्ण प्लाझ्मा, पण धोका नाही

Voyager ने सीमेजवळील प्लाझ्माचं तापमान जास्त असल्याचं नोंदवलं. मात्र अवकाशात कणांची संख्या कमी असल्यामुळे अंतराळयानावर परिणाम झाला नाही.

Interstellar Space Facts

|

esakal

अवकाशातील सूक्ष्म कंपन

Voyager च्या उपकरणांनी आंतरतारकीय प्लाझ्मामधील अतिशय सूक्ष्म कंपनही नोंदवली. त्यामुळे वैज्ञानिकांना सौरमालेच्या बाहेरचं वातावरण समजून घेता आलं.

Interstellar Space Facts

|

esakal

सीमा एकसारखी नाही

Voyager कडून मिळालेल्या माहितीवरून हेलिओस्फिअरची सीमा कायम स्थिर नसल्याचं स्पष्ट झालं. ही सीमा कधी पुढे सरकते, तर कधी मागे येते, हे स्पष्ट झालं.

Interstellar Space Facts

|

esakal

Voyager ची उर्जा संपली

Voyager यानांची ऊर्जा आता हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे NASA टप्प्याटप्प्याने त्यातील वैज्ञानिक उपकरणं बंद करत आहे.

Interstellar Space Facts

|

esakal

ऐतिहासिक मोहिम

अंतराळ संशोधनातील ऐतिहासिक मोहिमांपैकी एक म्हणून त्यांची कायम नोंद घेतली जाईल.

Interstellar Space Facts

|

esakal

विदर्भातील 'लाल महल' बघितला का? इतिसाहाची देतोय साक्ष

vidarbha lal killa 

|

esakal

हेही वाचा -