बाटलीबंद पाणी विकण्याची सुरुवात नेमकी कधी आणि कुठे झाली?

Shubham Banubakode

बिसलेरी चर्चेत का?

बिसलेरीच्या गोवा प्लांटमधील पाण्याचा एक नमुना असुरक्षित आढळला. यानंतर FSSAI ने कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे.

History of Bottled Water

|

Esakal

काय आढळलं?

तपासणीत एका नमुन्यात प्रतिलिटर १२ मायक्रोग्रॅम ब्रोमेट आढळले. निर्धारित मर्यादा १० मायक्रोग्रॅम असल्याने नमुन्याच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहे.

History of Bottled Water

|

Esakal

ब्रोमेट तयार कसं होतं?

पाणी शुद्ध करण्यासाठी ओझोनचा वापर केला जातो. मात्र, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये या प्रक्रियेतून ब्रोमेट नावाचं रासायनिक संयुग तयार होऊ शकतं.

History of Bottled Water

|

Esakal

स्पष्टीकरण

कंपनीने स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणी केल्याचं सांगितलं. या तपासणीत ब्रोमेटचं प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचा दावा बिसलेरीने केला.

History of Bottled Water

|

Esakal

कंपनीविरोधात खटला

खटला चालवण्याची मंजुरी म्हणजे कंपनी दोषी ठरली, असा अर्थ होत नाही. अंतिम निर्णय न्यायालयाच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.

History of Bottled Water

|

Esakal

सुरुवात कधी झाली?

युरोपमध्ये नैसर्गिक झऱ्यांचं पाणी बाटल्यांमध्ये भरून विकण्याची पद्धत १६व्या शतकात सुरू झाली. १५८३ मध्ये बेल्जियममधील स्पामध्येही पाणी विकलं जात होतं.

History of Bottled Water

|

Esakal

इतिहासात

इंग्लंडमध्ये १६२२ च्या सुमारास मॅल्वर्नच्या होली वेलमध्ये पाणी बाटल्यांत भरण्यास सुरुवात झाली. तर १७८३ मध्ये श्वेप्सने कार्बोनेटेड पाण्याची विक्री सुरू केली.

History of Bottled Water

|

Esakal

पहिली कंपनी

१८५० मध्ये कंपनीने मॅल्वर्नमध्ये बॉटलिंग प्लांट उभारला. त्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या इतिहासात या दोन्ही नावांचं महत्त्व आहे. मात्र, पहिली कंपनी कोणती, हे निश्चित सांगता येत नाही.

History of Bottled Water

|

Esakal

चीनमध्ये दही कसं साठवलं जातं? २१०० वर्ष जुनी अनोखी पद्धत!

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

हेही वाचा -