सकाळ डिजिटल टीम
कारले जरी कडू असले तरी त्याचे आनेक गुणकारी फायदे आहेत. कारल्याचा ज्यूस पिल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
कारल्याच्या ज्यूसमध्ये इन्सुलिन-सारखे घटक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामुळे मधुमेह (डायबिटीज) असलेल्या लोकांसाठी तो अत्यंत फायदेशीर मानला जातो.
यात कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हा रस प्यायल्याने पोट भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.
कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात.
कारल्याचा रस यकृत स्वच्छ ठेवतो आणि त्याचे कार्य सुधारण्यास मदत करतो. यामुळे यकृत डिटॉक्स (विषारी पदार्थ बाहेर काढणे) होते, ज्यामुळे यकृताचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. यामुळे मुरुम, पुरळ यांसारख्या समस्या कमी होतात आणि त्वचा चमकदार दिसते.
हा रस पचनक्रिया सुधारण्यासाठी ओळखला जातो. नियमितपणे याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता (Constipation) आणि अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
अभ्यासानुसार, कारल्यातील काही घटक कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
हा रस रक्त शुद्ध करण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात. शुद्ध रक्तामुळे एकूणच आरोग्य चांगले राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.