Mayur Ratnaparkhe
महाराष्ट्रात भाजपने डोंबिवली येथील आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केली आहे.
हिमाचल प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राजीव बिंदल यांची तिसऱ्यांदा नियुक्ती केली गेली आहे.
भाजपने उत्तराखंडमध्ये महेंद्र भट्ट यांना दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष पदावर बसवले आहे. महेंद्र भट्ट हे उत्तराखंड भाजपचे दहावे प्रदेशाध्यक्ष आहेत.
मिझोरमध्ये भाजपने माजी मंत्री के. बेईछुआ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली आहे.
अंदमान निकोबार या बेटावर भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान आणि पक्षाचे समर्पित कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या अनिल तिवारी यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे.
मध्य प्रदेश भाजपने दोन वेळा आमदार झालेल्या हेमंत खंडेलवाल यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पडुचेरीच्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर व्ही पी रामलिंगम यांची वर्णी लागली आहे. या पदासाठी अर्ज दाखल करणारे ते एकमेव उमेदवार होते.
तेलंगनात भाजपने एन रामचंद्र राव यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. अभाविपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे जवळच संबंध आहेत.Ma
आंध्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर पीवीएन माधव गारू यांची निवड झाली आहे. माधव यांचे वडील पी.व्ही. चलपती राव हे अविभाजित आंध्र प्रदेशचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष होते.