Black Cat Crossing Path : काळी मांजर अडवी गेल्यावर थांबताय? जाणून घ्या यामागील खरे कारण अन् शास्त्रीय दृष्टिकोन

बाळकृष्ण मधाळे

काळी मांजर अडवी गेली तर अशुभ?

रस्त्यात काळी मांजर आडवी गेली की अनेक जण थांबतात, तर काही जण मार्ग बदलतात. मांजर दिसणे म्हणजे काहीतरी वाईट घडणार, अशी समजूत समाजात वर्षानुवर्षे प्रचलित आहे; पण या समजुतीमागे नेमके सत्य काय?

Black Cat Crossing Path

|

esakal

अंधश्रद्धेची सुरुवात कशी झाली?

पूर्वीच्या काळात लोक बैलगाडी किंवा घोड्यावरून प्रवास करत असत. रात्री काळ्या मांजरीचे चमकणारे डोळे पाहून जनावरे घाबरू शकत होती. अपघात टाळण्यासाठी प्रवासी काही वेळ थांबत असत. यातूनच पुढे अशुभ संकेताची समजूत निर्माण झाली असावी.

Black Cat Crossing Path

|

esakal

आजारांच्या भीतीचाही संबंध

पूर्वी प्लेगसारख्या साथीच्या आजारांमुळे लोकांमध्ये भीती होती. मांजरींचा उंदरांशी संबंध जोडला जात असल्याने काही ठिकाणी त्यांच्याबद्दल नकारात्मक समजुती पसरल्या. मात्र, मांजर आडवी गेल्याने आजार किंवा संकट येते, याला वैज्ञानिक आधार नाही.

Black Cat Crossing Path

|

esakal

‘कन्फर्मेशन बायस’ म्हणजे काय?

मानसशास्त्रात ‘कन्फर्मेशन बायस’ म्हणजे आधीपासून असलेल्या समजुतीला दुजोरा देणाऱ्या घटनांकडे अधिक लक्ष देणे. काळी मांजर दिसल्यानंतर काम बिघडले तर तिच्याशी संबंध जोडला जातो; पण काम व्यवस्थित झाले तर ती गोष्ट दुर्लक्षित होते.

Black Cat Crossing Path

|

esakal

प्रत्येक देशात काळी मांजर अशुभ नाही!

भारतातील काही परंपरा आणि युरोपमधील काही समजुतींमध्ये काळी मांजर अशुभ मानली जाते. मात्र, जपान, ब्रिटन आणि स्कॉटलंडमधील काही परंपरांमध्ये काळ्या मांजरीला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Black Cat Crossing Path

|

esakal

मग, ही समजूत टिकून का आहे?

पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या गोष्टींवर लोक सहज विश्वास ठेवतात. एखादी वाईट घटना घडली की तिचा संबंध मांजरीशी जोडला जातो. अशा अनुभवांमुळे अंधश्रद्धा अधिक दृढ होत जाते.

Black Cat Crossing Path

|

esakal

विज्ञान काय सांगते?

काळी मांजर रस्ता ओलांडणे ही एक सामान्य नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे नशीब बदलते, काम बिघडते किंवा संकट येते, असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

Black Cat Crossing Path

|

esakal

मांजर दिसल्यास काय करावे?

काळी मांजर रस्ता ओलांडल्यास घाबरण्याची किंवा मार्ग बदलण्याची गरज नाही. मात्र, वाहन चालवत असाल तर मांजर रस्त्यावर असल्याने वेग कमी करणे आणि सुरक्षिततेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Black Cat Crossing Path

|

esakal

अंधश्रद्धेपेक्षा विवेक महत्त्वाचा!

काळी मांजर अशुभ असते, ही केवळ एक पारंपरिक समजूत आहे. तिचा व्यक्तीच्या नशिबाशी किंवा भविष्यातील घटनांशी संबंध नाही. त्यामुळे अंधविश्वासाला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचार स्वीकारा.

Black Cat Crossing Path

|

esakal

Vastu Beliefs About Bats at Night : रात्री झोपताना वटवाघूळ दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगते वास्तूशास्त्र

Bat Appearing at Night

|

esakal

येथे क्लिक करा...