Morning Black Coffee: सकाळी रिकाम्या पोटी 'ब्लॅक कॉफी' पिणे कितपत योग्य?

Mayur Ratnaparkhe

ट्रेंड की आरोग्य?

फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या ट्रेंडमध्ये रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे लोकप्रिय झाले आहे.

उर्जेसाठी फायदेशीर?

काळ्या कॉफीतील कॅफिन मेंदू सक्रिय करते.  उर्जेची पातळी वाढते,  लक्ष केंद्रित सुधारते,  झोप येणे कमी होते.

वजन कमी करण्यात मदत? -

काही संशोधनानुसार कॅफिन, चयापचय वाढवते,  कॅलरी बर्निंग वेगवान करते.

प्रत्येकासाठी नाही -

ज्यांना अ‍ॅसिडिटी, गॅस, छातीत जळजळ असे त्रास आहे त्यांनी काळजी घ्यावी. रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यास पोटातील आम्ल वाढू शकते.

पचनावर परिणाम? -

दीर्घकाळ सवय ठेवल्यास पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कॉर्टिसॉलची पातळी वाढते? -

सकाळी कॉर्टिसॉल नैसर्गिकरित्या जास्त असतो. रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्यास अस्वस्थताही जाणवू शकते. उच्च रक्तदाब असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

मग ब्लॅक कॉफी कधी प्यावी? -

हलक्या नाश्त्यानंतर घ्या,  दिवसातून १–२ कप पुरेसे,  जास्त सेवन टाळा. अतिसेवनाने झोपेच्या समस्या व डिहायड्रेशन होऊ शकते.

ब्लॅक कॉफी फायदेशीर? -

पण ती योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतल्यासच. आरोग्याच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Next : नोकरी करण्यासाठी योग्य वय किती असाव?

Perfect age for employment

|

ESakal

येथे पाहा