Yashwant Kshirsagar
कॉफी हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. लोक झोप घालवण्यासाठी आणि दैनंदिन कामे करण्यासाठी ऊर्जा मिळवण्याच्या उद्देशाने याचे सेवन करतात.
Black Coffee Side Effects
esakal
अनेक लोक चव किंवा आरोग्याच्या कारणामुळे दूध किंवा साखर घातलेल्या कॉफीपेक्षा 'ब्लॅक कॉफी'ला ( अधिक पसंती देतात.
Black Coffee Side Effects
esakal
मात्र, ब्लॅक कॉफीमधील कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असू शकते. काही लोकांसाठी ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. ब्लॅक कॉफी कोणा पिऊ नये हे जाणून घेऊया.
Black Coffee Side Effects
esakal
ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे चिंता किंवा तणावाचा त्रास असलेल्या लोकांनी ती टाळावी. यामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि संपूर्ण शरीरात थरथर जाणवू शकते.
Black Coffee Side Effects
esakal
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ब्लॅक कॉफी धोकादायक ठरू शकते, कारण ती रक्तदाब वाढवू शकते. त्यामुळे तिचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे.
Black Coffee Side Effects
esakal
ज्यांना आधीच निद्रानाशाचा त्रास आहे किंवा ज्यांना रात्री झोप लागण्यास अडचण येते, त्यांनी ब्लॅक कॉफी टाळावी. यामुळे झोपेत व्यत्यय येतो आणि दिवसा शरीराला थकवा जाणवतो.
Black Coffee Side Effects
esakal
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने ॲसिडिटी, गॅस आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी ब्लॅक कॉफीपासून दूर राहावे, कारण ती ॲसिडिटी वाढवू शकते.
Black Coffee Side Effects
esakal
कॉफीमध्ये 'पॉलीफेनॉल्स' असतात, जे अन्नातील लोहाच्या शोषणावर परिणाम करतात. त्यामुळे, ज्यांना आधीच ॲनिमियाचात्रास आहे, त्यांनी कॉफी टाळावी.यामुळे शरीरातील लोहाची पातळी आणखी कमी होऊ शकते.
Black Coffee Side Effects
esakal
Fruits For Long Life
esakal