Sandeep Shirguppe
केस काळे करण्यासाठी अनेकजण काळ्या मेहंदीचा वापर करतात. मात्र, ही मेहंदी पूर्णपणे नैसर्गिक असेलच असे नाही. त्यामध्ये रसायने असू शकतात.
Hair Dye Safety
esakal
अमोनिया असलेल्या हेअर कलरमुळे टाळूवर खाज, जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो. काही जणांना त्वचेची आगही होऊ शकते.
Hair Dye Safety
esakal
काही काळ्या मेहंदीमध्ये PPD नावाचे रसायन वापरले जाते. या रसायनामुळे त्वचेवर अॅलर्जी होण्याचा धोका असतो.
Hair Dye Safety
esakal
अॅलर्जी झाल्यास टाळू, कपाळ, कान आणि चेहऱ्यावर लालसरपणा, पुरळ किंवा सूज येऊ शकते.
Hair Dye Safety
esakal
रासायनिक रंगांचा वारंवार वापर केल्यास केस कोरडे आणि राठ होऊ शकतात. त्यामुळे केसांना नुकसान होण्याची शक्यता असते.
Hair Dye Safety
esakal
काळी मेहंदी किंवा हेअर कलर वापरण्यापूर्वी उत्पादनाच्या सूचनेनुसार पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे.
Hair Dye Safety
esakal
टाळूवर जखम, पुरळ, जळजळ किंवा सनबर्न असेल तर अशा वेळी काळी मेहंदी किंवा हेअर कलर लावणे टाळा.
Hair Dye Safety
esakal
खाज, जळजळ, पुरळ किंवा सूज जाणवल्यास मेहंदी लगेच धुवून काढा. त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Hair Dye Safety
esakal