कांद्यावर काळे डाग दिसतायत? सावध! ही विषारी बुरशी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक!

Aarti Badade

कांद्याचे महत्त्व

कांदा (Onion) हा भारतीय स्वयंपाकाचा अविभाज्य घटक आहे. त्यात जीवनसत्त्वे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात, जे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

Onion Black Spots

|

Sakal

काळ्या डागांचे कारण

कांद्यावर दिसणारे काळे पट्टे किंवा डाग साधारणत: 'अ‍ॅस्परजिलस नायगर' (Aspergillus niger) या बुरशीमुळे (Fungus/Mold) तयार होतात.

Onion Black Spots

|

sakal

बुरशी वाढण्याचे कारण

ही बुरशी मातीतील आणि हवेतील सामान्य बुरशी आहे. कांदा दबला गेला (Bruised) असेल किंवा ओलसर वातावरणात ठेवला गेला असेल, तर तिची वाढ अधिक होते.

Onion Black Spots

|

Sakal

विषारी ठरण्याची शक्यता

या बुरशीने संक्रमित कांद्यात मायकोटॉक्सिन्स (Mycotoxins) तयार होण्याची शक्यता असते, जे किडनीच्या हानीसह (Kidney Damage) इतर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.

Onion Black Spots

|

Sakal

कधी फेकावा?

जर बुरशी आत खोलवर शिरलेली असेल किंवा कांदा मऊ, ओलसर, चिकट किंवा कुजल्यासारखा (Rotten) झाला असेल, तर तो संपूर्ण कांदा फेकणे (Discard) सुरक्षित ठरते.

Onion Black Spots

|

Sakal

सुरक्षित वापर

निरोगी व्यक्तींसाठी, जर बुरशी फक्त बाहेरील थरांवर (Outer Layers) असेल, तर ते थर काढून टाका. आसपासचा भाग कापून कांदा स्वच्छ धुऊन चांगला शिजवून (Cooked Well) वापरावा.

Onion Black Spots

|

Sakal

साठवणुकीची पद्धत

कांदे थंड, कोरड्या, हवेशीर जागी (Ventilated Area) साठवा. बटाट्यासारख्या ओलसरपणा (Moisture) निर्माण करणाऱ्या भाज्यांबरोबर कांदे साठवू नयेत.

Onion Black Spots

|

Sakal

फक्त एक भाजी खा... किडनी–लिव्हर दोन्ही राहतील फिट!

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

येथे क्लिक करा