सकाळ डिजिटल टीम
हिंदू धर्मात आणि लोकपरंपरेनुसार काळा धागा बांधण्याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जण वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहदोषांपासून संरक्षण मिळावे यासाठी काळा धागा बांधतात. कोणत्या भागावर काळा धागा बांधावा आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत, याविषयी जाणून घेऊया..
Black Thread Significance
esakal
परंपरेनुसार महिलांनी डाव्या हाताला, तर पुरुषांनी उजव्या हाताला काळा धागा बांधल्यास शुभ परिणाम मिळतात, असे मानले जाते.
Black Thread Significance
esakal
काळा धागा बांधल्याने व्यक्तीवर येणारी वाईट नजर दूर राहते आणि नकारात्मक प्रभाव कमी होतो, अशी श्रद्धा आहे.
Black Thread Significance
esakal
काळा धागा शरीराभोवती एक प्रकारचे संरक्षणात्मक कवच तयार करतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा शरीरावर परिणाम करू शकत नाही, असे मानले जाते.
Black Thread Significance
esakal
मान्यतेनुसार, शरीरावर नकारात्मक ऊर्जा येताच काळा धागा ती ऊर्जा शोषून घेतो आणि व्यक्ती सुरक्षित राहते.
Black Thread Significance
esakal
शरीराच्या कोणत्याही भागावर श्रद्धा व इच्छाशक्तीने काळा धागा बांधल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात, असेही सांगितले जाते.
Black Thread Significance
esakal
कंबरेभोवती काळा धागा बांधल्याने मणक्याशी संबंधित समस्या टाळता येतात, अशी लोकमान्यता आहे.
Black Thread Significance
esakal
ज्यांच्या कुंडलीत शनि ग्रह कमजोर स्थितीत आहे, त्यांनी कंबरेभोवती काळा धागा बांधावा, असा सल्ला दिला जातो. मात्र, यासाठी आधी तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Black Thread Significance
esakal
काळा धागा आपोआप झिजून तुटल्यास त्यात काहीही अपशकुन मानले जात नाही. मात्र, तो स्वतःहून काढू नये. तुटलेला धागा पिंपळाच्या झाडाजवळ ठेवावा आणि त्यानंतर नवीन धागा बांधावा, अशी प्रथा आहे.
Black Thread Significance
esakal
प्रिय वाचकांनो, ही माहिती केवळ जनसामान्यांच्या श्रद्धा व उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. यामागील कोणत्याही दाव्यांचे ई-सकाळ समर्थन करत नाही.)
Black Thread Significance
esakal
Crow Lifespan
esakal