सकाळ वृत्तसेवा
महाकुंभसाठी लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजला जात आहेत. गंगेच्या पवित्र स्नानासाठी लोक कोणत्याही प्रकारे संगमात पोहोचतात. आता ब्लिंकिटच्या माध्यमातून गंगाजल घरी मिळू शकते.
ब्लिंकिट 100 मिली संगम पाणी 69 रुपयांना विकत आहे. गंगा आणि यमुना संगमाचे पाणी 15 मिनिटांत घरपोच मिळणार आहे. घरबसल्या धार्मिक विधींसाठी गंगाजल मिळवण्याची सुविधा ब्लिंकिटने सुरु केली आहे.
हे पाणी गंगा, यमुना आणि सरस्वती संगमाचे आहे. अनेक भाविक येथे स्नान करून पुण्य कमवतात.
भारतात आधीपासून गंगाजल, प्रसाद विक्री होत आहे. काही लोक याला उत्तम सुविधा मानतात. काही जण याला धर्माच्या नावाखाली व्यवसाय मानतात.
1 लिटर मिनरल वॉटर: ₹20. 1 लिटर संगम जल: ₹690. सोशल मीडियावर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
झटपट वितरणामुळे अधिक विक्री होणार आहे. तसेच यात जास्त नफा मिळवण्याची संधी देखील आहे.
काही लोक ही सोय मानतात, तर काहींना ही सुविधा महाग वाटते.