Aarti Badade
जेव्हा शरीराला इजा होते, तेव्हा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, पण कधीकधी या गुठळ्या अयोग्य ठिकाणी किंवा अवेळी तयार होतात, ज्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास शरीर नैसर्गिकरित्या गुठळ्या तयार करून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करते.
मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांसारख्या आजारांमुळे, तसेच काही अनुवांशिक कारणांमुळेही रक्त गोठण्याची शक्यता वाढते.
धूम्रपान, लठ्ठपणा, हार्मोनल बदल आणि काही औषधे देखील रक्त गुठळ्या होण्याचा धोका वाढवतात.
धमन्यांमध्ये चरबी जमा होऊन त्या अरुंद झाल्यावर गुठळ्या होण्याची शक्यता वाढते.
जर गुठळी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये तयार झाली, तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाल्यास अर्धांगवायू (स्ट्रोक) येऊ शकतो.
जेव्हा गुठळी फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडकते, तेव्हा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.