Aarti Badade
पावसाळ्यात पचनशक्ती मंद होते, दूषित पाणी आणि हवामानामुळे जुलाब, उलट्या होतात.
जुलाब झाल्यास शरीरातील पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्या. साखर पाणी, शहाळ्याचे पाणी थोड्या थोड्या प्रमाणात घेत राहावे.
सुंठ पावडर आणि बडीशेप एकत्र करून उकळलेले पाणी प्यावे, यामुळे पचन सुधारते.
डाळिंबाची साल, बेलफळाचे मगजचूर्ण, नागरमोथा पावडर यांचा काढा करून दिवसातून २-३ वेळा घ्यावा.
वेलदोड्याची भाजलेली साले मधासोबत चाटल्यास मळमळ, उलट्या कमी होतात. सूतशेखराची मात्रा पाण्याबरोबर घ्यावी.
पिण्याचे पाणी नेहमी उकळलेलेच असावे.
जेवणात भाताची पेज, पातळसर खिचडी, उकडलेल्या भाज्यांचे सूप, मुगाचे कढण असा पचायला हलका आहार घ्यावा.
सूप व कढण करताना जिरेपूड, हिंग, सुंठ पावडर जरूर घालावी.
पोटात मुरडा येऊन चिकट स्वरूपात शौचाला होणे याला 'आव' म्हणतात, यात प्रचंड थकवा जाणवतो. दूषित पाणी, शिळे पदार्थ हे कारण आहे.
मुरूडशेंग, सुंठ उगाळून दिवसातून ३-४ वेळा घेतल्यास पोटदुखी कमी होते. बडीशेप उकळलेले पाणी प्यावे. कुटजारिष्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.
पातळसर सूप, भाताची पेज, मुगाचे कढण असा अगदी हलका आहार घ्यावा.