Saisimran Ghashi
हल्ली हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशरचे रुग्ण खूप वाढले आहेत.
ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास उन्हाळ्यात काही पदार्थ टाळलेच पाहिजेत.
पापड, लोणचं, चिप्स, फरसाण यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असते, जे रक्तदाब वाढवू शकते.
कॅनमधील सूप, डबाबंद भाज्या आणि प्रक्रिया केलेले मांस हे सोडियमने भरलेले असतात.
समोसे, भजी, वडा-पाव यासारखे पदार्थ शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवून रक्तदाब वाढवतात.
जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेतल्यास हृदयावर ताण येतो.
आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हलका, पचायला सोपा व नैसर्गिक आहार घेणे फायदेशीर ठरते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.