हार्ट अटॅक अन् पॅरालिसिस झटक्याचा धोका टाळायचा आहे? मिनिटांत करा ही एकच टेस्ट..

Saisimran Ghashi

अपोलिपोप्रोटीन बी चाचणी


ही चाचणी वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण दाखवते, जे हृदयाला नुकसान पोहोचवू शकते. ही चाचणी लिपिड प्रोफाइलपेक्षा अधिक अचूक माहिती देते आणि हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी उपयुक्त आहे.

Apolipoprotein B Test benefits | esakal

सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन चाचणी


शरीरातील सूज किंवा जळजळ ओळखण्यासाठी ही चाचणी केली जाते. ही लपलेली जळजळ हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे संकेत देऊ शकते.

hs-CRP Test benefits | esakal

ओमेगा 3 इंडेक्स चाचणी


ही चाचणी रक्तातील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स (EPA आणि DHA) चे प्रमाण मोजते. कमी ओमेगा-3 इंडेक्स असल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो.

Omega-3 Index Test benefits | esakal

उपवास इन्सुलिन चाचणी


या चाचणीत उपवासानंतर शरीरातील इन्सुलिनची पातळी तपासली जाते. इन्सुलिन रेझिस्टन्स, प्री-डायबिटीज किंवा मधुमेह यांसारख्या स्थिती लवकर ओळखण्यासाठी उपयुक्त आहे.

Fasting Insulin Test benefits | esakal

होमोसिस्टीन चाचणी


शरीरातील होमोसिस्टीनचे प्रमाण जास्त असल्यास हृदयविकार, स्ट्रोक, डिमेंशिया आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

Homocysteine Test benefits | esakal

नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व


बहुतांश लोक या महत्त्वाच्या चाचण्यांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे अनेक आजार उशिरा समजतात आणि नुकसान आधीच झालेले असते.

heart attack detection test | esakal

वेळेवर चाचणी


वरील चाचण्या वेळेवर करून घेतल्यास हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि इतर गंभीर आजार लवकर ओळखून टाळता येतात, तसेच योग्य ती खबरदारी घेता येते.

paralysis prediction test benefits | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

disclaimer | esakal

योगासने करताना अजिबात करू नका 'या' 3 चुका..!

Yoga mistakes to avoid | esakal
येथे क्लिक करा