'ब्लू जीन्स'चा इतिहास माहितीये? फॅशन नव्हे तर 'या' कारणासाठी झाली होती निर्मिती

Vinod Dengale

फॅशनसाठी नाही

आज जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कपड्यांपैकी एक म्हणजे ‘ब्लू जीन्स’. पण तुम्हाला माहिती आहे का? आजची ही स्टायलिश फॅशन सुरुवातीला फॅशनसाठी बनवलीच गेली नव्हती!

मजुरांसाठी

खरंतर, ब्लू जीन्सची निर्मिती अमेरिकेतील सोन्याच्या खाणींमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी करण्यात आली होती.

टिकाऊ पॅन्ट

त्या काळात कामगारांना टिकाऊ आणि मजबूत कपड्यांची गरज होती, कारण सामान्य पॅन्ट काम करताना लवकर फाटायच्या.

भन्नाट कल्पना

यातूनच पुढे टेलर जेकब डेविस यांनी पॅन्टच्या खिशांजवळ आणि बटणाजवळ मेटल रिवेट्स लावून पॅन्ट अधिक मजबूत बनविण्याची भन्नाट कल्पना शोधली.

‘ब्लू जीन्स’चा जन्म

त्यानंतर 20 मे 1873 रोजी व्यावसायिक लेवी स्ट्रॉस आणि टेलर जेकब डेविस यांना या पॅन्टचं पेटंट मिळालं. त्यामुळे याच दिवशी ‘ब्लू जीन्स’चा जन्म झाला असं म्हटलं जात.

कारखाना

सुरुवातीला या पॅन्टची शिवणकाम घरातून काम करणाऱ्या महिलांकडून केली जात होती. नंतर 1880 च्या दशकात स्वतःचा कारखाना सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं.

‘ब्लू जीन्स'

सुरुवातीला या पॅन्टला “Waist Overalls” असं म्हटलं जायचं. पण पुढे हीच पॅन्ट जगप्रसिद्ध ‘ब्लू जीन्स’ बनली.

Levi’s

1890 मध्ये लॉन्च झालेली Levi’s 501 Jeans इतकी लोकप्रिय झाली की ती अमेरिकेतील सर्वाधिक विकली जाणारी वर्क पॅन्ट ठरली.

पुण्याजवळचा सनसेट, बोटिंग आणि ट्रेकिंगचा परफेक्ट प्लॅन; पाहताच तुम्हीही बॅग पॅक कराल!

Perfect Weekend Escape Near Pune! Sunset, Boating & Trekking at One Stunning Place

|

eSakal

हेही वाचा