बाळकृष्ण मधाळे
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
Blueberry Benefits
esakal
रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक तिसऱ्या मृत्यूमागे हृदयविकार हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा आहारामध्ये ब्लूबेरी हे फळ विशेष फायदेशीर मानले जाते.
Blueberry Benefits
esakal
आकाराने लहान असले तरी ब्लूबेरीमध्ये भरपूर पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. विशेषतः त्यामध्ये आढळणारे अँथोसायनिन्स हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
Blueberry Benefits
esakal
संशोधनानुसार, दररोज योग्य प्रमाणात ब्लूबेरीचे सेवन केल्यास रक्तवाहिन्यांचे कार्य अधिक चांगले होते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
Blueberry Benefits
esakal
मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या व्यक्तींसाठीही ब्लूबेरी फायदेशीर ठरू शकते. नियमित सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Blueberry Benefits
esakal
तसेच रक्तातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
Blueberry Benefits
esakal
याशिवाय, ब्लूबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित प्रमाणात ब्लूबेरीचा आहारात समावेश करता येऊ शकतो.
Blueberry Benefits
esakal
तज्ज्ञांच्या मते, ब्लूबेरीचे संपूर्ण आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी दररोज सुमारे एक कप ब्लूबेरीचे सेवन करणे उपयुक्त ठरते.
Blueberry Benefits
esakal
अर्धा कप ब्लूबेरी खाल्ल्यास अपेक्षित लाभ कमी प्रमाणात मिळू शकतो. मात्र, कोणत्याही आहारातील बदल करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Blueberry Benefits
esakal
Why should you eat beetroot during monsoon?
esakal