Aarti Badade
आजकाल ब्लूटूथ इयरफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सर होतो का? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
Bluetooth Cancer Risk myth
Sakal
ब्लूटूथ उपकरणे 'नॉन-आयनाइजिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड' (EMF) तंत्रज्ञानावर काम करतात. २०१५ मध्ये काही शास्त्रज्ञांनी याच्या संभाव्य धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
Bluetooth Cancer Risk myth
Sakal
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, वायरलेस उपकरणांच्या वापरामुळे कॅन्सर होतो, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही.
Bluetooth Cancer Risk myth
Sakal
तज्ज्ञांच्या मते, मोबाईल थेट कानाला लावून बोलण्यापेक्षा ब्लूटूथ वापरणे अधिक सुरक्षित आहे, कारण ब्लूटूथ उपकरणे मोबाईलच्या तुलनेत खूपच कमी रेडिएशन उत्सर्जित करतात.
Bluetooth Cancer Risk myth
Sakal
रेडिएशन दोन प्रकारचे असते: 'आयनाइजिंग' आणि 'नॉन-आयनाइजिंग'. ब्लूटूथमधून निघणारे 'नॉन-आयनाइजिंग' रेडिएशन कमी ऊर्जेचे आणि कमी धोकादायक मानले जाते.
Bluetooth Cancer Risk myth
Sakal
आयनाइजिंग रेडिएशन (उदा. एक्स-रे) पेशी आणि डीएनएला हानी पोहोचवू शकते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका असतो. मात्र, ब्लूटूथमध्ये एवढी ऊर्जा नसते.
Bluetooth Cancer Risk myth
Sakal
जरी थेट कॅन्सरचा धोका नसला, तरी तासनतास इयरफोन वापरल्याने कानाच्या पडद्याला इजा होणे किंवा ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
Bluetooth Cancer Risk myth
Sakal
सुरक्षिततेसाठी इयरफोनचा वापर मर्यादित ठेवा, कामापुरताच वापर करा आणि वेळोवेळी कानांना विश्रांती द्या. अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानावर आधारित माहिती घ्या.
Bluetooth Cancer Risk myth
Sakal
Fruit Facial Tips
Sakal