सुट्टीसाठी आलेले ब्रिटिश जोडपे ३० वर्षे तामिळनाडूच्या जंगलातच का राहिले?

सकाळ डिजिटल टीम

बॉब आणि तान्या

वर्ष १९८५ मध्ये बॉब आणि तान्या हे दोन ब्रिटिश तरुण कुडाळाईला केवळ काही दिवसांच्या सुट्टीसाठी आले होते.

Story of Bob and Tanya

|

sakal

३० वर्षे का थांबले?

पण ते तिथेच रमले आणि त्यांनी पुढची ३० वर्षे जंगलांच्या संवर्धनासाठी घालवून आयुष्य जंगलासाठी वेचले.

Story of Bob and Tanya

|

sakal 

ब्रिटिश राजवटीतील चुकीचा निर्णय

पूर्वी परदेशी निलगिरीची झाडे लावल्यामुळे तामिळनाडूचे पाणी टिकवणारी प्राचीन 'शोला' जंगले नष्ट होऊ लागली होती.

Story of Bob and Tanya

|

sakal 

१९८० चे दशक

८७ टक्के गवताळ प्रदेश नष्ट झाल्यामुळे दुर्मिळ फुले, पक्षी आणि वन्यप्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आले होते.

Story of Bob and Tanya

|

sakal 

राहत्या घरातच रोपे

कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी राहत्या घरातच रोपे तयार करून जंगलाच्या संवर्धनाचे काम सुरू केले.

Story of Bob and Tanya

|

sakal 

ट्रस्टची स्थापना

कॅक्टसची रोपे विकून खर्च भागवत त्यांनी हा प्रकल्प चालवला, ज्यामध्ये स्थानिकांनीही मोठी साथ दिली.

Story of Bob and Tanya

|

sakal 

वनविभागाची परवानगी

वर्ष २००१ मध्ये वनविभागाने मंजुरी दिल्यानंतर त्यांनी नष्ट होत चाललेली जंगले पुन्हा यशस्वीपणे उभी करून दाखवली.

Story of Bob and Tanya

|

sakal 

दुर्मिळ वनस्पतीचा शोध

जंगलातील अनेक संकटांचा सामना करत त्यांनी नामशेष मानल्या गेलेल्या 'पालनी हिल्स रुद्राक्ष' या दुर्मिळ वनस्पतीचा शोध लावला.

Story of Bob and Tanya

|

sakal

तरुण पर्यावरणप्रेमी

बॉब आणि तान्याच्या निधनानंतर त्यांनी घडवलेले तरुण पर्यावरणप्रेमी आज तामिळनाडूच्या जंगलांचे आणि पाण्याच्या स्रोतांचे रक्षण करत आहेत.

Story of Bob and Tanya

|

sakal 

पंजाबच्या 'या' राजाकडे होता २९३० हिरे जडवलेला नेकलेस!

History of Patiala Necklace

|

sakal 

आणखी वाचा