पंजाबच्या 'या' राजाकडे होता २९३० हिरे जडवलेला नेकलेस!

सकाळ डिजिटल टीम

पतियाळाचे महाराजा भूपिंदर सिंह

पंजाबमधील समृद्ध पतियाळा संस्थानावर १९०९ ते १९३८ दरम्यान राज्य करणारे महाराजा भूपिंदर सिंह त्यांच्या अत्यंत विलासी जीवनशैलीसाठी जगभर प्रसिद्ध होते.

History of Patiala Necklace

|

sakal

'कार्टियर' कंपनी

महाराजांनी त्यांच्या शाही दागिन्यांची फेररचना करण्यासाठी आणि एक अद्वितीय हार तयार करण्यासाठी १९२६ मध्ये जगप्रसिद्ध 'कार्टियर' कंपनीला अधिकृत आदेश दिला होता.

History of Patiala Necklace

|

sakal

पॅरिसला पाठवले अमूल्य हिरे व रत्ने

या भव्य दागिन्यासाठी लागणारे शेकडो माणके, पाचे, सुटे हिरे आणि जगप्रसिद्ध 'डी बियर्स' हिरा बंद पेट्यांमध्ये भरून जहाजातून पतियाळाहून पॅरिसला पाठवण्यात आला होता.

History of Patiala Necklace

|

sakal

दोन वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झाला शाही हार

कार्टियरच्या कुशल कारागीरांनी अहोरात्र मेहनत करून तब्बल दोन वर्षांनंतर म्हणजेच १९२८ मध्ये हा ऐतिहासिक आणि भव्य हार पूर्णपणे तयार केला होता.

History of Patiala Necklace

|

sakal

२९३० हिरे आणि प्लॅटिनमचा बेस

या हारामध्ये प्लॅटिनमच्या बेसवर एकूण २९३० हिरे बसवण्यात आले होते, ज्यांचे एकत्रित वजन तब्बल ९२५.६२ कॅरेट एवढे प्रचंड होते.

History of Patiala Necklace

|

sakal

कोहिनूरपेक्षाही दुप्पट आकाराचा 'डी बियर्स' हिरा मध्यभागी

या हाराच्या अगदी मध्यभागी २३४ कॅरेटचा फिकट पिवळसर रंगाचा 'डी बियर्स' हिरा बसवला होता, जो कोहिनूरपेक्षा जवळपास दुप्पट आकाराचा होता.

History of Patiala Necklace

|

sakal

रहस्यमयी रीतीने हार गायब

महाराजा भूपिंदर सिंह यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र महाराजा यादवेंद्र सिंह यांच्याकडे हा हार आला, पण १९६० च्या दशकात हा मौल्यवान हार अचानक कुठेतरी गायब झाला.

History of Patiala Necklace

|

sakal

लंडनच्या दुकानात सापडला

१९९८ मध्ये हा हार लंडनच्या एका दुकानात केवळ रिकाम्या फ्रेमच्या स्वरूपात सापडला, कारण त्यातील सर्व मुख्य हिरे आधीच काढून विकले गेले होते.

History of Patiala Necklace

|

sakal

३ कोटी डॉलर

कार्टियर कंपनीने नंतर तो हार जिरकॉनच्या सहाय्याने पूर्ववत बनवून पॅरिसमध्ये प्रदर्शनासाठी ठेवला; आज हा मूळ हार असता तर त्याची किंमत ३ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त असती.

History of Patiala Necklace

|

sakal

चालुक्यांची राजधानी असलेल्या बदामी शहराचा इतिहास काय?

History of badami 

|

sakal

आणखी वाचा