Saisimran Ghashi
शरीरात व्हिटॅमिन किंवा अन्य काही कमतरतेमुळे सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो.
पण काम करताना थकवा जाणवू लागल्यास कामावर नकारात्मक परिणाम होतो.
जरी कामात नसताना अशक्तपणा जाणवू लागला तरी दिवसभर बराच त्रास होतो.
हल्ली ही समस्या खूप वाढत चालली आहे. त्यामुळे तुम्ही जेवणात खास भाजी खावून ही समस्या दूर करू शकता.
टोमॅटोमध्ये पोषकतत्वे असतात, जे थकवा दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे टोमॅटोची भाजी खा.
जास्तीत जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने अशक्तपणा आणि थकवा कमी होतो.
तुम्ही रताळे खावू शकता. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि थकवा येत नाही.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.