सकाळच्या नाश्त्यात उकडलेलं अंड का असावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

सकाळ डिजिटल टीम

उकडलेलं अंड

सकाळच्या नाश्त्यात उकडलेलं अंड का असावं? काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या.

Boiled Eggs

|

sakal 

प्रथिने

उकडलेल्या अंड्यात उच्च दर्जाची प्रथिने असतात, जी स्नायूंच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते.

Boiled Eggs

|

sakal 

कमी भूक

अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते, ज्यामुळे तुम्हाला अनावश्यक खाण्यापासून वाचता येते. हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मनले जाते.

Boiled Eggs

|

sakal 

पोषक तत्व

अंड्यामध्ये 'कोलीन' (Choline) नावाचे महत्त्वाचे पोषक तत्व असते, जे मेंदूच्या कार्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक मानले जाते.

Boiled Eggs

|

sakal 

मोतीबिंदू

अंड्यांमध्ये 'ल्युटीन' (Lutein) आणि 'झेक्सॅन्थिन' (Zeaxanthin) सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास आणि मोतीबिंदूसारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.

Boiled Eggs

|

sakal 

व्हिटॅमिन डी

अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. यामुळे हाडे मजबूत होतात.

Boiled Eggs

|

sakal 

व्हिटॅमिन बी

अंडं हे व्हिटॅमिन बी-१२ (B12), सेलेनियम, झिंक आणि व्हिटॅमिन ए (A) यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.

Boiled Eggs

|

sakal 

हृदयाचे आरोग्य

अंड्यांमध्ये असलेले पोषक तत्वे शरीरातील 'चांगले कोलेस्ट्रॉल' (HDL) वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

Boiled Eggs

|

sakal 

खनिज

अंड्यात असलेले व्हिटॅमिन आणि खनिजं तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात.

Boiled Eggs

|

sakal 

केळीच्या सालीचे एक नाहीतर 7 जबरदस्त फायदे

banana peel benefits | Sakal
येथे क्लिक करा