Anushka Tapshalkar
आजकाल सगळेच आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत आणि वजन योग्य ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करून पाहतात. अंडी खाल्ली की फायदा होतो हे माहित असलं तरी वजन कमी करण्यासाठी अंडं नेमकं कसं खाल्लं पाहिजे, याबद्दल मात्र सगळेच गोंधळात असतात.
अंडं हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ते उकडलेलं असो किंवा ऑम्लेट, ते प्रथिनं आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे!
अंड उकडताना तेल, तूप किंवा बटर यांसारखे कोणतेही फॅटयुक्त घटक लागत नाहीत, त्यामुळे त्यात कॅलरीज कमी असतात. याच्या उलट, ऑम्लेट बनवताना तेल, तूप किंवा बटर यांची आवश्यकता असते. तसेच, चव वाढवण्यासाठी ऑम्लेटमध्ये इतर घटक देखील घातले जातात.
एक उकडलेलं अंड = साधारण ७० कॅलरीज
तर साधं ऑम्लेट = ९० ते २०० कॅलरीज (साहित्य व तेलावर अवलंबून).
उकडलेल्या अंड्यात फॅट कमी असतं, तर ऑम्लेटमध्ये तेल किंवा बटर वापरल्यामुळे फॅट वाढतं.
प्रत्येक प्रकारात ६–७ ग्रॅम प्रथिनं मिळतात, ज्यामुळे स्नायूंसाठी दोन्ही प्रकार लाभदायक आहेत.
टोमॅटो, पालक, कांदा आणि ढोबळी मिरची घातल्यास ऑम्लेट अधिक अधिक पौष्टिक आणि फायबरयुक्त बनतं.
वजन कमी करण्यासाठी उकडलेलं अंडं हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. कारण यामध्ये कमी कॅलरीज असून पोट भरणारं आणि आरोग्यदायी आहे.
परंतु तुम्ही दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधू शकता. कधी उकडलेलं अंडं खा, तर कधी भाज्यांचं ऑम्लेट तयार करा. दोन्ही गोष्टी आहारात एकत्रितपणे समाविष्ट करा.