Anushka Tapshalkar
प्रेग्नंसीत हार्मोनल बदलांमुळे क्रेव्हिंग्स वाढतात, पण याच काळात आहारात योग्य काळजी घेणे गरजेचे असते. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी काही अन्नपदार्थ टाळणे अत्यंत आवश्यक असते.
हाय मर्क्युरी मासे जसे की टूना, शार्क, स्वॉर्डफिश प्रेग्नसीदरम्यान खाणे टाळा. यामधील मर्क्युरी (पारा) बाळाच्या मेंदूच्या विकासावर वाईट परिणाम करू शकतो.
कच्च्या अंड्यांमध्ये सॅल्मोनेला नावाचा जीवाणू असतो. यामुळे उलटी, जुलाब व गर्भपाताचा धोका निर्माण होतो.
अस्वच्छ फळं-भाज्यांवर जीवाणू व परजीवी असतात. यामुळे टॉक्सोप्लास्मोसिससारखे संसर्ग होऊन बाळाला धोका होऊ शकतो.
पाश्चरायझ न केलेल्या दुधात लिस्टीरिया, इ. कोलाई यांसारखे हानिकारक जीवाणू असतात. हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात.
कच्च्या पपईत लेटेक्स असतो, जो गर्भाशयाच्या संकोचाला कारणीभूत ठरतो. अननसामध्ये असलेले ब्रोमेलिन गर्भपाताचा धोका वाढवते. फणस पचनास अवघड ठरू शकतो.
प्रोसेस्ड फूडमध्ये साखर, मिठाचे प्रमाण जास्त असते आणि पोषणमूल्य कमी असतात. हे अन्न वजन, मधुमेह व उच्च रक्तदाब वाढवू शकते.
प्रेग्नसीदरम्यान मद्यपान पूर्णपणे टाळावे, कारण अगदी थोडे प्रमाणही बाळासाठी घातक ठरू शकते. यामुळे फेटल अल्कोहोल सिंड्रोम, गर्भपात किंवा मृतजन्माचा धोका वाढतो.
कॅफीन अधिक प्रमाणात घेतल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो. दररोज २०० मिग्रॅ. पेक्षा अधिक कॅफीन घेणे टाळावे. यामध्ये चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट्स यांचा समावेश होतो.